शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृत आईवर केले परस्पर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:50 IST

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी येथील एका तरुणाने अपघातात मृत्यू झालेल्या आपल्या आईवर कुणालाही माहिती न देता, परस्पर ...

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी येथील एका तरुणाने अपघातात मृत्यू झालेल्या आपल्या आईवर कुणालाही माहिती न देता, परस्पर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात नीलेश रघुनाथ दळवी (वय २६, रा. उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. बाळाबाई रघुनाथ दळवी (वय ५५) असे मृत आईचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ६ डिसेंबर रोजी नीलेश दळवी हा आपल्या आईला घेऊन दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होता. त्यावेळी दुचाकीवरून त्याची आई बाळाबाई दळवी ह्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांच्या कानास व डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली; पण पुढे दोन दिवसांत त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनली. उपचारांचा खर्च मोठा असल्याने व तो गरीब परिस्थितीमुळे न परवडणारा असल्याने नीलेश दळवी याने अत्यवस्थ स्थितीत आईला घरी नेले. त्यानंतर दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला; पण अपघातातील जखमीच्या मृत्यूची माहिती करवीर पोलीस ठाण्याला न देता मृतदेहावर परस्पर उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. याबाबत चौकशी होऊन नीलेश दळवी याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे हे. कॉ. किरण माने करीत आहेत.

(तानाजी)