शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोल-२ आंबेआहोळच्या प्रकरणात मुश्रीफ यांनी कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आंबेआहोळ मध्यम प्रकल्पासाठीची संपादित जमीन श्री स्वामी जगद‌्गुरू शंकराचार्य पीठाची असून या जमिनीच्या बदल्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : आंबेआहोळ मध्यम प्रकल्पासाठीची संपादित जमीन श्री स्वामी जगद‌्गुरू शंकराचार्य पीठाची असून या जमिनीच्या बदल्यात योग्य नुकसान भरपाई पीठाला मिळालेली नाही. हे प्रकरण आजतागायत उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तरी यात मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी असलेल्या व बेकायदेशीर वागलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पीठाचे सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी शनिवारी पत्रकाद्वारे केली.

जमीन संपादनाच्या कारवाईदरम्यान भूसंपादन अधिकाऱ्यांनी २००६ रोजी नुकसान भरपाईची रक्कम तीन कोटी ७७ लाख आठ हजार ८२९ इतकी निश्चित केली होती. या जमिनी पीठाच्या मालकीच्या असून नुकसान भरपाईबाबत ट्रस्टने आक्षेप घेतला होता. या आक्षेपानंतर हे प्रकरण दिवाणी न्यायालयात येणे आवश्यक होते. मात्र विशेष भूसंपादन अधिकारी यांनी ही रक्कम अधिकार नसलेल्या व्यक्तींना घाईने वाटून टाकली व त्यातील केवळ ३१ लाख ३६ हजार ६२५ रुपये न्यायालयात जमा केले. त्यानंतर ४२ लाख नऊ हजार ९४४ रुपये न्यायालयात जमा केल्याचे खोटे नमूद करीत न्यायालयाची दिशाभूल केली. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाने भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिलेला निकाल रद्द केला व संपादनाच्या बदल्यात द्यायची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याबाबत शासनाने कारवाई केलेली नाही.

मुश्रीफ यांचे वक्तव्य चुकीचे

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा दावा निकाली निघाला आहे, असे चुकीचे वक्तव्य केल्याने समाजाची दिशाभूल होऊ शकते. मंत्री मुश्रीफ यांनी प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याऐवजी जगद‌्गुरूंचा दावा निकाली निघाला आहे, असे वक्तव्य केले आहे. तरी त्यांनी बाबींची चौकशी करून व आवश्यकता वाटल्यास जगद‌्गुरूंशी संपर्क साधून पीठाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पीठाने केली आहे.

--

इंदुमती गणेश