चारित्र्याच्या संशयावरुन डोक्यात हातोडा घालून पतीकडून पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 14:39 IST2023-12-03T14:38:52+5:302023-12-03T14:39:14+5:30

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, संभाजी पोवार हा आपल्या पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून वारंवार त्रास देत होता

Murder of wife by husband with hammer on head due to suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरुन डोक्यात हातोडा घालून पतीकडून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरुन डोक्यात हातोडा घालून पतीकडून पत्नीचा खून

आजरा : आजारी असताना शेळं जेवण का वाढले व चारित्र्याच्या संशयातून पतीने  पत्नी सुमन संभाजी पोवार ( वय ४६ )  हिच्या डोक्यात हातोडा घालून खून केला आहे. ही घटना सुळे ( ता.आजरा ) येथे रात्री ९ वाजण्यास सुमारास घडली. पोलिसांनी पती संभाजी ईश्वर पोवार ( वय ५८ )  याला ताब्यात घेतले आहे.        

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, संभाजी पोवार हा आपल्या पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून वारंवार त्रास देत होता. रात्री जेवायला बसले असताना दोघांमध्ये शेळं जेवण का वाढले या कारणावर भांडणाला सुरुवात झाली त्यामधूनच संभाजी पोवार यांनी हातोडा घेऊन पत्नी सुमनच्या डोक्यात घातला व तेथून तो दुसऱ्या घरात झोपायला निघून गेला. सकाळी आपली पत्नी उठत नाही म्हणून पोलीस पाटील सूर्यकांत केसरकर यांना बोलावून घेतले. त्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संभाजी पोवार याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजीव नवले, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगुडे, बाजीराव कांबळे, संदीप म्हसवेकर, संतोष गस्ती यांनी भेट दिली.

 

Web Title: Murder of wife by husband with hammer on head due to suspicion of character