शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महापालिका प्रभाग चार सदस्यीय होण्याची शक्यता, अधिकारी आदेशाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:28 IST

इच्छुकांच्या नजरा राज्य सरकारच्या निर्णयाकडे

कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू ठेवा, असे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्यानंतर लवकरच प्रभाग रचनेबाबतचा धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रभाग रचना त्रिसदस्यीय होणार की चौसदस्यीय याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान सरकार चौसदस्यीय प्रभाग रचनेसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात येते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्यात आणि चार आठवड्यांत त्याचा कार्यक्रम सुरू करावा, असे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला प्रभाग रचना प्रक्रिया सुरू करा, असे पत्राने कळविले आहे. प्रभाग रचना कशी करावी याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यामुळे आयोगाने तशी सूचना करून एकप्रकारे निवडणूक प्रक्रिया सुरु केली असल्याचे सांगितले जाते.सरकारलाही आता प्रभाग रचना कशी असावी याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन तसा अध्यादेश निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाने २०२२ च्या निवडणूक प्रक्रियेनुसार कार्यवाही करावी, असे म्हटले होते परंतु तशा स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे त्रिसदस्यीय होणार की चौसदस्यीय प्रभाग ठेवायचे हे राज्य सरकारला ठरवावे लागणार आहे.राजकीय पक्षातील नेतेमंडळी तसेच अधिकारी पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार भाजप सरकार चौसदस्यीय प्रभाग रचना करण्याच्या मन:स्थितीत आहे. चौसदस्यीय प्रभाग रचना महायुतीला फायदेशीर ठरू शकते, असा दावा केला जातो म्हणूनच चौसदस्यीय प्रभाग होण्याची दाट शक्यता आहे. राजकीय ताकद कमी असलेल्या पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांच्या दृष्टीने अशी प्रभाग रचना फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे अनेक उमेदवार रिंगणात उतरण्यापूर्वीच बाहेर फेकले जाणार आहेत.अधिकारी आदेशाच्या प्रतीक्षेतकोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सन २०२२ मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचना तयार केली होती, ओबीसींसह प्रभागांवरील आरक्षणही टाकले होते. त्यामुळे हीच पद्धत कायम ठेवली तर महापालिका अधिकाऱ्यांचे काम सोपे होणार आहे. परंतु तसे घडण्याची शक्यता फारच कमी आहे. अधिकारी काय आदेश येतोय याच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणMuncipal Corporationनगर पालिका