शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांना पालिका निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या वर्षावर येऊन ठेपली आहे. जनतेतून ऐवजी नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने ...

संदीप बावचे

जयसिंगपूर : नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या वर्षावर येऊन ठेपली आहे. जनतेतून ऐवजी नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने येणाऱ्या निवडणुकीला महत्त्व आले आहे. जयसिंगपुरात आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जात असल्या तरी आगामी निवडणुकांचे राजकारण गृहीत धरून नेतेमंडळी राजकीय पेरणी करतात. राज्यातील सत्ताबदलामुळे नगरपालिकेची येणारी निवडणूक आघाडी की पक्षीय पातळीवर याबाबतही उत्सुकता लागून राहिली आहे.

गत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित राजर्षी शाहू विकास आघाडी; तर शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप व मित्रपक्षांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. बहुमत ‘शाहू’चे, तर नगराध्यक्ष ताराराणी आघाडीचा झाला होता. काही विकासकामांवरून दोन्ही आघाड्यांमध्ये समझोता एक्स्प्रेस धावली होती. मात्र, दोन्ही आघाड्यांमध्ये पुन्हा बिनसले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. गेल्या वर्षभरापासून दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांमध्ये पुन्हा एकोपा निर्माण होऊन विकासाचे राजकारण सुरू झाले आहे.

विषय समित्यांच्या निवडीत स्वाभिमानीला सत्ताधारी शाहू आघाडीने स्थान दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने सहमतीच्या राजकारणाला आतापासून सुरुवात झाली आहे.

.........

यड्रावकरांच्या भूमिकेकडे लक्ष

सन २०१९ च्या निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर आमदार झाले. त्यानंतर त्यांना राज्यमंत्रिपदही मिळाल्याने तालुक्यात यड्रावकर गटाची राजकीय ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून यड्रावकर यांची राजकीय रणनीती सुरू असून ते आगामी नगरपालिका निवडणुकीची व्यूहरचना कशी करतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

............

राजकीय मंडळींच्या भूमिकेकडे लक्ष

गत निवडणुकीत डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील शाहू आघाडीत होते; तर माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपचे अनिल यादव, डॉ. अशोकराव माने ही राजकीय मंडळी ताराराणी आघाडीत होती. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे बळ ताराराणी आघाडीला होते. सध्या राजकीय संदर्भ बदलल्यामुळे पालिका निवडणुकीत नेत्यांचे राजकीय आडाखे कसे राहतील, याबाबतही उत्सुकता आहे.