शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक; संभ्रमात अधिकच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : एकीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ‘एक प्रभाग, एक सदस्य’ प्रभागरचनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविली गेली असताना आता दुसरीकडे ...

कोल्हापूर : एकीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ‘एक प्रभाग, एक सदस्य’ प्रभागरचनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविली गेली असताना आता दुसरीकडे राज्य सरकारच्या पातळीवर ‘चौसदस्य’ प्रभाग रचना करण्याचा विचार सुरू असल्याच्या चर्चेने कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक नेमकी कशी होणार, याबाबत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. जर राज्य सरकारने निर्णय घेतला तर आतापर्यंत झालेली अर्धी प्रक्रिया रद्द करणार का, महापौरपदाचे आरक्षण बदलणार का, असे प्रश्न त्यांना पडले असून, इच्छुक धास्तावले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक १५ नोव्हेंबर २०२० पूर्वी होणे अपेक्षित होते; परंतु कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य सरकारने कोल्हापूर महानगरपालिकेस निवडणूकपूर्व प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालिका प्रशासनाने प्रभाग निश्चिती, प्रभागावरील आरक्षण, प्रभागनिहाय कच्ची मतदार यादी, पक्की मतदार यादी तयार केली आहे. मार्चनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस सुरुवात झाली. त्यामुळे ही प्रक्रिया अर्ध्यावर थांबवावी लागली.

आता कुठे कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असताना पुन्हा निवडणुका कधी लागणार, याची उत्कंठा लागली असतानाच ओबीसी आरक्षण आणि आता चौसदस्य प्रभाग चर्चेत आले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेसह पाच महापालिकांची सभागृहे अस्तित्वात नाहीत, तर पुढील वर्षीच्या मार्चअखेर आणखी दहा महानगरपालिकांच्या सभागृहांची मुदत संपणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सहा महिने आधी करावी लागते. ती सुरू होण्याची वेळ आली असतानाच ओबीसी आरक्षण आणि चौसदस्य प्रभाग रचना चर्चेत आली आहे.

एकीकडे पाच महापालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना ती थांबविल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच आता चौसदस्य प्रभाग रचना केली जाणार असल्याची चर्चा सुुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

जवळपास अर्धी पूर्ण झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द होईल का, आरक्षणे नव्याने टाकणार का, चौसदस्य प्रभाग रचना अस्तित्वात येणार का, ओबीसी आरक्षण नव्याने टाकणार का, महापौरपदाचे आरक्षण बदलणार का, अशा अनेक प्रश्नांनी इच्छुकांना भंडावून सोडले आहे. या प्रश्नांची नेमकी व खात्रीशीर माहिती कोणाकडे नसल्याने संपूर्ण निवणुकीबाबतच संभ्रम आहे. महापालिका अधिकारीसुद्धा याबाबत संभ्रमात आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनांप्रमाणे पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल, असे अधिकारी सांगत आहेत.