शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

भिन्न क्षमतेच्या ताऱ्यांना ‘मुक्ता’चे पंख...

By admin | Updated: August 26, 2015 00:11 IST

हेल्पर्स, चेतना, अंधशाळेला अर्थसाहाय्य : विद्यार्थ्यांच्या कलादर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम

कोल्हापूर : समाजात सर्वसामान्य म्हणून वावरणाऱ्या व्यक्तींना लाजवेल असा सळसळता उत्साह, शारीरिक आणि बौद्धिक अपंगत्व आलेले असले तरी त्यावर मात करीत गायन, नृत्य, विविध कला आणि स्वावलंबनाने आपल्यातील भिन्न क्षमता मांडणाऱ्या ताऱ्यांच्या स्वप्नांना ‘मुक्ता मंच’ने आर्थिक सहकार्याचे बळ दिले. यानिमित्त झालेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विशेष विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना सकारात्मक जगण्याची जणू दृष्टीच दिली. शाहू स्मारक भवनमध्ये मंगळवारी मुक्ता मंचने हेल्पर्स आॅफ दि हँडिकॅप्ड, चेतना अपंगमती विकास संस्था आणि ज्ञानप्रबोधिनी संचलित अंधशाळा या तीन संस्थांमधील भिन्नक्षम विद्यार्थ्यांच्या कलादर्शनाचा ‘तारे जमीं पर’, ‘मूव्हिंग द वर्ल्ड टुगेदर’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर उपस्थित होते. यावेळी ‘हेल्पर्स’ संस्थेचे पी. डी. देशपांडे, चेतना संस्थेचे कार्याध्यक्ष पवन खेबुडकर, अंधशाळेचे प्रकाश पाटील, ‘मुक्ता’ संस्थेच्या सुवर्णा गांधी, उज्ज्वला कर्नावट, वर्षा जैन, नीता कोठारी उपस्थित होत्या. यावेळी शिपूरकर यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेचा संदर्भ देत मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘हेल्पर्स आॅफ द हँडिकॅप्ड’मधील मुलामुलींनी चाकाच्या खुर्चीवरून विविध प्रकारच्या संगीतावर डोलणारा व पाहणाऱ्याला खिळवून ठेवणारा नृत्याविष्कार सादर केला. चेतना विकास संस्थेच्या अपंगमती विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा, छोटा भीम, नन्हा मुन्हा राही हूॅँ, आज दिल है पानी, दबंग, अशा विविध गीतांवर नृत्य सादर केले. ‘ज्ञानप्रबोधिनी’ संचलित अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार गीते सादर केली.