शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी मंत्र्यांना धरले धारेवर

By admin | Updated: November 27, 2014 00:20 IST

लोकसभेत महाडिक आक्रमक : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे वेधले लक्ष

कोल्हापूर : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील आज, बुधवारी झालेल्या कामकाजावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. सर्व शिक्षण अभियान अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणदेऊन अनेक सुविधाही दिल्या जातात; मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेभोवती संरक्षक भिंत बांधण्यास तसेच क्रीडांगण उभारण्यास निधी दिला जात नाही याकडे लक्ष वेधून महाडिक यांनी मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री उपेंद्र कुषवाह यांना जाब विचारला. यावेळी महाडिक आक्रमक झाले होते.धनंजय महाडिक यांनी मंत्री कुषवाह यांना पुरवणी पत्रिकेद्वारे संसद सभागृहात प्रश्न विचारले, तेव्हा कॉँग्रेस, जनता दल, तृणमूल कॉँग्रेससह विरोधी बाकावरील सर्वच खासदारांनी त्यांना जोरदार पाठिंबा दिला. ‘पढे भारत - बढे भारत’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी पुरेशी शिक्षक भरती झाली आहे का, असा प्रश्न महाडिक यांनी उपस्थित केला. देशातील मुलांना मोफत शिक्षणासोबत करोडो रुपये खर्च करून सुविधा दिल्या जातात; पण शाळांना संरक्षक भिंत बांधण्यास व क्रीडांगण विकसित करण्यास निधी दिला जात नाही, त्यामुळे मुलांची सुरक्षितता धोक्यात येते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावेळी मंत्री कुषवाह यांनी शिक्षकांची कमतरता असल्याचे मान्य करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे आधारस्तंभ आणि भविष्य आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खेळांच्या माध्यमातून सशक्त पिढी घडविण्यासाठी सरकार कोणती उपाययोजना आखणार, असा प्रश्न महाडिक यांनी विचारला. त्यावेळी महाडिक यांच्या प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराबद्दल सभागृहाचे समाधान झाले नाही. त्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधी सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. ( प्रतिनिधी )मंत्र्यांचा उडाला गोंधळमहाडिक यांचा प्रश्न योग्य असला, तरी बहुतेक शाळांत जागांची कमतरता असल्याची माहिती मंत्री कुषवाह यांनी सभागृहाला दिली. त्यावर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी मार्मिक टिप्पणी करीत, मंत्री महोदयांना शासनाच्या धोरणाचीच माहिती नसल्याचा दावा केला. शाळेला परवानगी देतानाच किमान दीड एकर जमीन आवश्यक असून, त्यातील एक एकर क्रीडांगणासाठी आवश्यक असल्याची अट असताना मंत्री महोदय जागेची कमतरता असल्याचे कसे सांगतात याबाबत सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले.