शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘चिल्लर पार्टी’साठी नऊ महिन्यांनंतर उघडणार सिनेमाचा पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी छोट्या मुलांसाठी दाखविण्यात येणाऱ्या सिनेमांचे ...

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी छोट्या मुलांसाठी दाखविण्यात येणाऱ्या सिनेमांचे प्रदर्शनही थांबवण्यात आले होते. मात्र, या काळात तब्बल ४८ बालचित्रपट ऑनलाइन दाखविण्यात आले होते. आता २८ फेब्रुवारीपासून ‘चिल्लर पार्टी’साठी हा सिनेमाचा प्रत्यक्ष पडदा पुन्हा उघडणार आहे. गेली नऊ महिने प्रत्यक्ष चित्रपटगृहातील सिनेमांचे प्रदर्शन बंद होते.

लॉकडाऊनच्या काळातही चिल्लर पार्टीच्या छोट्यांसाठी सिनेमा दाखविण्याच्या उपक्रमात खंड पडला नव्हता. ऑनलाइन पद्धतीने पालकांचे व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करून त्या माध्यमातून दर रविवारी बालचित्रपटांच्या लिंक पाठवल्या. कोल्हापुरातीलच नव्हे तर जगभरातील दोन हजार पालक आणि मुले या माध्यमातून सहभागी झाले. या काळात जगभरातील एकूण ४८ बालचित्रपटांची पर्वणी छोट्या मुलांबरोबर पालकांनाही मिळाली.

व्हिडिओच्या माध्यमातून कलाकारांनी साधला संवाद

यानिमित्त चिल्लर पार्टीच्या व्यासपीठावरून अभिनेता सागर तळाशीकर, स्वप्नील राजशेखर, आनंद काळे, शशांक शेंडे, समिधा गुरू, चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, प्रभाकर वर्तक, शरद भुताडीया, संजय मोहिते, भरत दैनी, विद्यासागर अध्यापक, रेहान नदाफ, अनुप बेलवलकर, रोहित हळदीकर, अजय कुरणे आदी कलाकारांनी व्हिडिओच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला. हे व्हिडिओ चिल्लर पार्टीच्या फेसबुक आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरून प्रसारित करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

कोट

चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी छोट्या मुलांसाठी विनामूल्य सिनेमा दाखविण्यात येतात. लॉकडाऊननंतर आता फेब्रवारी महिन्यापासून पुन्हा शाहू स्मारक भवन येथे सिनेमे दाखविण्यात येणार आहेत. या उपक्रमात मोठ्या संख्येने छोट्यांनी सहभागी व्हावे आणि जगभरातील बालचित्रपटांचा आनंद घ्यावा.

-मिलिंद यादव,

चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ

---------------------------

(फोटो :११०२२०२१-कोल-चिल्लर पार्टी)

संदीप आडनाईक