शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नवीन किमानवेतन रद्द होईपर्यंत आंदोलन

By admin | Updated: September 7, 2015 00:28 IST

उद्योजक, कारखानदारांचा निर्णय : दावे मागे घेतल्यास सायझिंग सुरू : कोळी

इचलकरंजी : शासनाने जाहीर केलेले यंत्रमाग कामगारांचे सुधारित किमान वेतन आणि महागाई निर्देशांक वस्त्रोद्योगासाठी घातक आहे. म्हणून सुधारित किमानवेतन व महागाई निर्देशांक रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार शहरातील उद्योजक व कारखानदारांच्या सभेत व्यक्त करण्यात आला.दरम्यान, कामगार संघटनेचा चालू असलेला संप आणि दाखल केलेले क्लेम अ‍ॅप्लिकेशनचे दावे मागे घेईपर्यंत सायझिंग कारखाने बंदच राहतील, अशी घोषणा सायझिंगधारक कृती समितीचे प्रमुख संतोष कोळी यांनी केली.शनिवारी जिल्हाधिकारी अमित सैनी व जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या पुढाकाराने येथील सायझिंग व यंत्रमाग क्षेत्रातील मालक आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील सर्व उद्योजक आणि कारखानदार यांची एक सभा औद्योगिक वसाहतीतील कल्याण केंद्राच्या आवारात सायझिंगधारक कृती समितीने आयोजित केली होती. या सभेत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, माजी अध्यक्ष राजगोंड पाटील, यंत्रमाग जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ मेटे यांची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी शासनाने नवीन जाहीर केलेले किमान वेतन सायझिंग कारखान्यांबरोबर यंत्रमाग उद्योगाशी लागू असल्याचे सांगितले. तसेच ते व्यावहारिकदृष्ट्या न परवडणारे असल्याने आणि अवाजवी दरवाढ करणारा मुंबई महागाई निर्देशांकसुद्धा यंत्रमाग उद्योगास हानीकारक असल्यामुळे तो रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी वसंतराव पाटील, प्रकाश गौड, बंडोपंत लाड, अनिल मगदूम, दिलीप ढोकळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कामगार संघटनांचा दृष्टिकोन टोकाचासंतोष कोळी यांनी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेवर जोरदार टीका केली. कामगार नेते ए. बी. पाटील यांचा आंदोलनाचा दृष्टिकोन अव्यवहार्य व टोकाचा असल्याने त्यांच्याबरोबर सायझिंग संघटना चर्चा करणार नाही, याचा पुनरुच्चार केला आणि संप बेशर्त मागे घ्यावा व क्लेम अ‍ॅप्लिकेशनचे दावे त्वरित रद्द करावेत. त्यानंतरच कामगारांना वेतनवाढ देऊन सायझिंग कारखाने सुरू करू, असेही स्पष्ट केले.