प्रेमसंबंध प्रत्यक्ष पाहणाऱ्या मुलाचा आईकडून छळ, ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आईला प्रियकरांसह अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 12:57 IST2022-07-08T12:57:13+5:302022-07-08T12:57:29+5:30
मुलगा दुपारी १२ वाजता शाळेतून अचानक घरी आला. त्यावेळी त्याची आई व प्रियकर मनोज पोवार यांचे घरातच लैंगिक संबंध त्याच्या दृष्टीस पडले. त्यावेळी आई व तिच्या प्रियकराने मुलास मारहाण केली.

प्रेमसंबंध प्रत्यक्ष पाहणाऱ्या मुलाचा आईकडून छळ, ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आईला प्रियकरांसह अटक
कोल्हापूर : प्रियकरांसोबतचे लैंगिक संबंध पोटच्या मुलाने पाहिल्यानंतर ते कोणाला सांगू नये म्हणून क्रूरकर्मा आईने व त्या नराधम प्रियकराने त्या मुलांकडून लाजवेल असे अघोरी कृत्य करून घेत त्याचा अमानुष छळ केला. कोणाला सांगितल्यास तुला विष पाजून ठार मारू, अशी धमकी आईसह दोघांनी दिली. माणुसकीला काळिमा फासणारी घटना कोल्हापूर शहरात घडली.
दरम्यान, संबंधित १५ वर्षांच्या मुलाने नराधम प्रियकारासह आईविरोधात गुरुवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने दोघांनाही अटक केली. मनोज पोवार (वय ३७ रा. बागल चौक) असे त्या संशयित नराधमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहा महिन्यांपूर्वी संबंधित मुलगा दुपारी १२ वाजता शाळेतून अचानक घरी आला. त्यावेळी त्याची आई व प्रियकर मनोज पोवार यांचे घरातच लैंगिक संबंध त्याच्या दृष्टीस पडले. त्यावेळी आई व तिच्या प्रियकराने मुलास मारहाण केली. तसेच प्रकार वडिलांना सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दोघांनीही दिली.
त्यानंतर पुढील आठवडाभर मुलाची आई व नराधम प्रियकराने त्या मुलाकडून लाजवेल असे किळसवाणे, अघोरी कृत्य वारंवार करून घेतले. हा प्रकार बाहेर कोणाला अगर वडिलांना सांगितल्यास तुला आणि तुझ्या वडिलांना जेवणातून विष घालून ठार मारणार असल्याची धमकी दिली. अशाच पध्दतीने त्या दोघांनी दुसऱ्या भावालाही धमकी दिली होती.
दरम्यान, सहन न झाल्याने मुलाने ही घटना वडिलांना सांगितली, त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार मुलाची आई व तिचा नराधम प्रियकर मनोज पोवार या दोघांना गुरुवारी सायंकाळी अटक केली.