शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

वारणा नदीत मुलीसह आईची उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

याबाबत समजलेली माहिती अशी, रेश्मा या रुदा मुलीसह रात्री उशिरा वारणा नदीवर आत्महत्या करायला गेल्या होत्या. ...

याबाबत समजलेली माहिती अशी, रेश्मा या रुदा मुलीसह रात्री उशिरा वारणा नदीवर आत्महत्या करायला गेल्या होत्या. तिथे असणाऱ्या मच्छीमार व अन्य एका तरुणाने अपरात्री येण्याचे कारण विचारून त्यांना परत पाठविले होते. तद्नंतर रात्री उशिरा तिने मुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बोटीच्या साहाय्याने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. महिलेचा मृतदेह बुधवारी सकाळी १० च्या सुमारास, तर मुलीचा मृतदेह दुपारी ४ च्या सुमारास नदीपात्रात सापडला. रेश्मा हिच्या पतीचे साधारण तीन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. ती कोडोली येथे तिच्या आईजवळ राहत होती; परंतु आईचेही दोन वर्षांपूर्वी निधन झाले. ती कोडोलीत खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह चालवीत होती. तिने काही वर्षांपूर्वी रुदा हिला दत्तक घेतले होते; परंतु ती वयाने मोठी झाल्यावर मतिमंद असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे रेश्मा काही दिवसांपासून अस्वस्थ होती. या कारणास्त्व तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, फौजदार नरेंद्र पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक जाधव व कर्मचारी कोडोलीचे तलाठी अनिल पोवार उपस्थित होते.