गारगोटी; दारवाड (ता.भुदरगड) येथील बाळासो गणपती मोरे (वय ७०) यांचे बुधवारी (दि.२१) निधन झाले. त्यांच्या जाण्याने घरावर शोककळा पसरली होती. नातेवाईक, आप्तस्वकीय आणि गावकऱ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. घरातील सदस्य अजूनही या दुःखातून सावरत असतानाच गुरुवारी (दि.२२) त्यांच्या रक्षाविसर्जनाचा दिवस उजाडला, त्या दिवशी आई हौसाबाई गणपती मोरे (वय ८८) यांचे निधन झाले. मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीय दुःख सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आईनेही या जगाचा निरोप घ्यावा, ही घटना मोरे कुटुंबीयांसाठी असह्य ठरली. आई–मुलामधील अतूट नातं, त्यांच्यातील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक ओलावा या घटनेतून प्रकर्षाने समोर आला आहे.बाळासो गणपती मोरे यांचे रक्षाविसर्जन गुरुवारी नियोजित होते.मात्र, त्याच दिवशी आई हौसाबाई मोरे यांच्या निधनाने दु:ख अधिक गडद झाले. जन्मभर सावलीसारखी साथ देणारी आई आणि तिच्या आयुष्याचा आधार असलेला मुलगा मृत्यूनंतरही वेगळे होऊ शकले नाहीत. त्यामुळे आई व मुलाचे रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि.२३) एकत्र करण्याचा हृदयद्रावक निर्णय कुटुंबीयांनी घेतला. नियतीच्या या विलक्षण आणि वेदनादायी खेळाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात खोल जखमा निर्माण केल्या.
Web Summary : In a tragic Kolhapur incident, a mother, Housabai More (88), passed away on the day of her son Balaso More's (70) ashes immersion. The family, already grieving the son's death, decided to perform a joint immersion ceremony, highlighting their inseparable bond.
Web Summary : कोल्हापुर में एक दुखद घटना में, बेटे बालासो मोरे के अस्थि विसर्जन के दिन माँ हौसाबाई मोरे (88) का निधन हो गया। बेटे की मौत से पहले से ही दुखी परिवार ने संयुक्त विसर्जन समारोह करने का फैसला किया, जो उनके अटूट बंधन को दर्शाता है।