Maharashtra Assembly Election 2019: लाखाहून अधिक मते तरीही गुलालापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:56 AM2019-10-30T11:56:24+5:302019-10-30T12:08:15+5:30

विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेऊनही राज्यातील बाराजण गुलालापासून वंचित राहिले, तर ४० हजारांपेक्षा कमी मते मिळूनही अमित झणक, मोहन हंबर्डे व झिशान सिद्धीकी यांना गुलाल लागला, तर राज्यात सर्वांत कमी म्हणजे ३२ हजार ८८३ मते मिळून हंबर्डे आमदार झाले. मागील निवडणुकीत ‘एमआयएम’चे अ‍ॅड. वारिस पठाण यांना केवळ २५ हजार ३१४ मते असूनही ते आमदार झाले होते.

 More than a million votes still missing from Gulal: Within 5 thousand votes still 'Gulal' | Maharashtra Assembly Election 2019: लाखाहून अधिक मते तरीही गुलालापासून वंचित

Maharashtra Assembly Election 2019: लाखाहून अधिक मते तरीही गुलालापासून वंचित

Next
ठळक मुद्दे४० हजारांच्या आत मते तरीही ‘गुलाल’राज्यातील बाराजणांना विजयाची हुलकावणी

राजाराम लोंढे
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेऊनही राज्यातील बाराजण गुलालापासून वंचित राहिले, तर ४० हजारांपेक्षा कमी मते मिळूनही अमित झणक, मोहन हंबर्डे व झिशान सिद्धीकी यांना गुलाल लागला, तर राज्यात सर्वांत कमी म्हणजे ३२ हजार ८८३ मते मिळून हंबर्डे आमदार झाले. मागील निवडणुकीत ‘एमआयएम’चे अ‍ॅड. वारिस पठाण यांना केवळ २५ हजार ३१४ मते असूनही ते आमदार झाले होते.

मागील निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना व भाजपने स्वबळ अवलंबिले होते; त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात मतांची विभागणी झाली; त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक मते घेऊन विजयी झालेल्यांची संख्या फारच कमी होती. आता युती व आघाडी एकसंधपणे लढल्याने तब्बल ८६ जण एक लाखापेक्षा अधिक मते घेऊन विजयी झाले.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे आष्टीचे उमेदवार सुरेश धस, ‘शेकाप’चे पनवेलचे बाळाराम पाटील, तर ‘करवीर’मधील कॉँग्रेसचे पी. एन. पाटील, कागलमधील शिवसेनेचे संजय घाटगे यांना एक लाखापेक्षा अधिक मते मिळूनही पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत मात्र १२ उमेदवारांना एक लाखापेक्षा अधिक मते मिळूनही गुलालापासून वंचित राहावे लागले.

यामध्ये ‘दौंड’ मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे रमेश थोरात यांचा अवघ्या ७४६ मतांनी भाजपचे राहुल कुल यांनी पराभव केला. पराभूत १२ उमेदवारांपैकी सर्वाधिक मते एक लाख १७ हजार ९२३ ही ‘खडकवासला’ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांना मिळाली. त्यांचा भाजपचे भीमराव तापकीर यांनी २५९५ मतांनी पराभव केला.

अजित पवार यांची दुसऱ्यांदा आघाडी

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांना ‘बारामती’ मतदारसंघातून एक लाख ५० हजार ५८८ मते मिळाली होती. यावेळेला त्यात वाढ होऊन तब्बल एक लाख ९३ हजार ५०५ मते मिळाली, ते राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. त्यांच्या पाठोपाठ विश्वजित कदम यांना एक लाख ७१ हजार ४९७ मते मिळाली. दोघांनीही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त केल्या.

लाखभर मते तरीही पराभव झालेले उमेदवार :

उमेदवार                   मतदारसंघ                 पक्ष                 मते
चंद्रदीप नरके                करवीर             शिवसेना            १,१२,५९८
सचिन दोडके           खडकवासला         राष्ट्रवादी           १,१७,९२३
राहुल कलाटे                चिंचवड               अपक्ष              १,१२,२२५
बाबूराव पाचर्णे              शिरूर               भाजप               १,०३,०८९
हर्षवर्धन पाटील           इंदापूर               भाजप               १,११,८५०
रमेश थोरात                   दौंड               राष्ट्रवादी            १,०२,९१८
उत्तमराव जानकर     माळशिरस        राष्ट्रवादी           १,००,९१८
ज्ञानज्योती भदाणे    धुळे ग्रामीण           भाजप             १,११,०११
प्रदीप शर्मा                   नालासोपारा      शिवसेना          १,०६,१०३
भीमराव धोंडे                  आष्टी             भाजप              १,०१,०८८
सुरेश भोमर              कामठी (नागपूर)  कॉँग्रेस            १,०५,३४९
विजय भांबळे               जिंतूर              राष्ट्रवादी         १,१३,१९६
 

 

Web Title:  More than a million votes still missing from Gulal: Within 5 thousand votes still 'Gulal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.