शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्याप्रमाणे निर्मला सीतारामनकडून महाराष्ट्राचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कागल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याशी संबंधित साहित्य खरेदीवरील जीएसटी माफ करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कागल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याशी संबंधित साहित्य खरेदीवरील जीएसटी माफ करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यामुळे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांचे सर्व अर्थमंत्री सदस्य असणारी एक समिती नेमली. मात्र, त्याचे अध्यक्षपद मेघालयसारख्या छोट्या राज्याच्या अर्थमंत्र्यांकडे दिले. वास्तविक ते अजित पवार यांना द्यायला हवे होते. पंतप्रधान मोदींप्रमाणे निर्मला सीतारामनही महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

कागल येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे जीएसटीचे २४ हजार कोटी रूपये केद्राकडून येणे बाकी आहेत. मेघालय कोठे आणि महाराष्ट्र कोठे, पण महाराष्ट्राला कमी लेखण्याचे भाजपचे धोरणच ठरले आहे. पंतप्रधानांनी चक्रीवादळाबद्दल गुजरातला एक हजार कोटींची नुकसानभरपाई जाहीर केली. पश्चिम बंगाल, ओडीसालाही नुकसानभरपाई जाहीर केली, पण महाराष्ट्राला यातून वगळले. त्यामुळे संधी मिळेल तिथे ही मंडळी महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करणारा गजेंद्र पाटील म्हणजे दुसरा परमवीर सिंग आहे. केवळ आरोपामुळे अनिल देशमुखांसारख्या चांगल्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागला. खाकीतील हे दरोडेखोर हजारो कोटींची उलाढाल करतात. हे आधी गजाआड झाले पाहिजेत.

चौकट

● चंद्रकांत पाटील यांना मस्ती आली आहे. ते कोणावरही धमकीच्या भाषेत टीका करत आहेत. छगन भुजबळ जामीनावर सुटलेले आहात, अशी भाषा बोलले होते. आता अजितदादांवर बोलत आहेत. त्यांच्यावर एक व्यंग्यचित्र छापून आले आहे. झोपेत पंलगावरून खाली पडले तरी सरकार पडले, सरकार पडले, असे ते ओरडत आहेत, अशी टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.