शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

राजारामपुरीत सराईत मोबाइल चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

कोल्हापूर : ग्रामीण भागात तसेच शहराच्या उपनगरात निर्मनुष्य रस्त्यावर महिलांचे मोबाइल अथवा पर्स हिसडा मारून लांबणाऱ्या चोरट्यास राजारामपुरी पोलिसांनी ...

कोल्हापूर : ग्रामीण भागात तसेच शहराच्या उपनगरात निर्मनुष्य रस्त्यावर महिलांचे मोबाइल अथवा पर्स हिसडा मारून लांबणाऱ्या चोरट्यास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. सुमित महादेव निकम (वय २५, रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव, रा. कर्नाटक) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचे १४ मोबाइल हॅडसेट व दुचाकी जप्त केली. कोल्हापूर शहरासह हुपरी, कणेरीवाडी, कागल गडहिंग्लज, मुरगुड, चिकोडी, निपाणी, संकेश्वर येथे दुचाकीवरून जाऊन महिलांचे मोबाइल चोरल्याचे उघडकीस आले, अशी माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल व दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ होताना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या सूचनेनुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल यांनी पथके तयार केली. शुक्रवारी दुपारी राजारामपुरीत दुचाकीवरून पेट्रोलिंग करताना चौदाव्या गल्लीत दीपा गॅस एजन्सीनजीक पोलीस देवानंद बल्लारी यांना विनानंबर प्लेट दुचाकीवर हेल्मेट घातलेला संशयित तरुण दिसला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला पकडले. अंगझडतीमध्ये त्याच्या पिशवीत सात मोबाइल सापडले. खाक्या दाखवताच त्याने महिलांचे मोबाइल व पर्स हिसडा मारून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्याला अटक केली. त्याने, कोल्हापूर शहरात दोन, हुपरी, कणेरीवाडी, कागल गडहिंग्लज, मुरगूड, चिकोडी, निपाणी, संकेश्वर आदी ठिकाणी दुचाकीवरून जाऊन मोबाइल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन लाख ३६ हजार २०० रुपये किमतीचे चोरीचे १४ मोबाइल हँडसेट जप्त केले. न्यायालयाने त्याला दि. ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे, गुन्हे शोध पथकातील समीर शेख, सचिन देसाई, महेश पवार, सुरेश काळे, विशाल शिरगावकर, देवानंद बल्लारी, भूषण ठाणेकर, सत्यजित सावंत यांनी केली.

दोन महिन्यांपूर्वीच विवाह

सुमित याचे १२ वीपर्यंत शिक्षण झाले. त्याचे आई-वडील शेतकरी आहेत. कोरोनामुळे त्याची एमआयडीसीतील नोकरी गेली; पण त्याने त्याची वाच्यता केली नाही. दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याचा सुशिक्षित मुलीशी विवाह झाला. त्यानंतरही तो रोज घरातून जेवणाचा डबा घेऊन नोकरीसाठी घराबाहेर पडून चोऱ्या करत होता. चोरलेले मोबाइल तो ग्रामीण भागात निम्म्या किमतीत विकत होता. लग्नापूर्वी त्याने चारचाकी वाहन घेण्यासाठी काहींच्या कडून पैसे उचलेले होते, त्यांचा वसुलीसाठी तगादा लागल्याने त्याने हे मोबाइल चोरीचे कृत्य केले.

पोलिसांनाही चकवा...

चोरलेला मोबाइल तो जेवणाच्या डब्यात लपवत होता. त्यामुळे पोलिसांनी आडवले, तरीही जेवणाचा डबा न उघडल्यामुळे त्याची चोरी कधीही उघडकीस आली नाही. राजारामपुरीत त्याने महिलेचा मोबाइल चोरल्याची कबुली दिली. त्यावेळी त्याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यामुळे त्याला पोलिसांनी शोधून काढले.

फोटो नं. ०३०४२०२१-कोल-सुमित निकम(आरोपी मोबाइल चोर)

फोटो नं. ०३०४२०२१-कोल-मोबाइल चोरी०१

ओळ : कोल्हापुरात राजारामपुरी पोलिसांनी मोबाइल चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरीचे मोबाइल जप्त केले. (फोटो : आदित्य वेल्हाळ)

===Photopath===

030421\03kol_1_03042021_5.jpg~030421\03kol_2_03042021_5.jpg

===Caption===

फोटो नं. ०३०४२०२१-कोल-सुमित निकम(आरोपी मोबाईल चोर)फोटो नं. ०३०४२०२१-कोल-मोबाईल चोरी०१ओळ : कोल्हापूरात राजारामपूरी पोलिसांनी मोबाईल चोरट्यास अटक करुन त्याच्याचकडून चोरीचे मोबाईल जप्त केले.  (फोटो आदीत्य वेल्हाळ)~फोटो नं. ०३०४२०२१-कोल-सुमित निकम(आरोपी मोबाईल चोर)फोटो नं. ०३०४२०२१-कोल-मोबाईल चोरी०१ओळ : कोल्हापूरात राजारामपूरी पोलिसांनी मोबाईल चोरट्यास अटक करुन त्याच्याचकडून चोरीचे मोबाईल जप्त केले.  (फोटो आदीत्य वेल्हाळ)