शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचा जिल्हाप्रमुखांवर पलटवार!

By admin | Updated: May 22, 2014 01:14 IST

शिवसेनेत चांगलीच जुंपली : मेळावा, पत्रकार परिषदेत टीकास्त्र; वाद चव्हाट्यावर संजय पवारांचा विधानसभेवर डोळा : क्षीरसागर

कोल्हापूर : आंदोलने भासवून अधिकार्‍यांना वेठीस धरत सेटलमेंट करणार्‍या नालायक पदाधिकार्‍यांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. पक्षाला सातत्याने वेठीस धरणार्‍या संजय पवार यांनी प्रथमत: स्वत:ची लायकी पाहूनच माझ्या पक्षनिष्ठेवर शंका उपस्थित करावी. विधानसभा होईपर्यंत या नालायक पदाधिकार्‍यांना प्रत्युत्तर करून भीक घालणार नाही, असा पलटवार आज (बुधवार) आमदार राजेश क्षीरसागर यांनी संजय पवार व विजय देवणे यांच्यावर केला. क्षीरसागर यांनी दैवज्ञ बोर्डिंग सभागृहात पदाधिकार्‍यांचा मेळावा घेतला. क्षीरसागर म्हणाले, जिल्हाप्रमुख या नात्याने देवणे व पवार यांनी जिल्ह्यात कोणती पक्षबांधणी केली. सोबत असणार्‍या टोळक्यांना घेऊन सेटलमेंट आंदोलनांशिवाय काहीही केले नाही. पवार यांच्याकडे उत्तर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी होती. शहरवगळता ४४ हजारांचे मताधिक्य विरोधी उमेदवारास मिळाले. दहा-बाराजणांचे टोळके घेऊन ‘धनुष्यबाण-धनुष्यबाण’ असे ओरडत गल्ली-बोळांतून फिरणे म्हणजे प्रचार नव्हे. अशाने मतदान मिळत नाही. ५१ ठिकाणी कोपरासभा तसेच दररोज आठ तास प्रचार केला आहे, असे स्पष्टीकरण क्षीरसागर यांनी केले. यावेळी माजी महापौर विलासराव सासने, पूजा भोर, नगरसेविका सुनीता माळी, सदानंद कोरगावकर, प्रा. विजय कुलकर्णी, धर्माजी सायनेकर, शिवाजी जाधव, आदींनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)