शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

महाडिक भ्याले, म्हणून तर ते रडीचा डाव खेळले; सतेज पाटील यांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:48 AM

कुस्ती लढायचे असेल तर मर्दासारखी लढा

कसबा बावडा : राजाराम कारखाना निवडणूक छाननीत विरोधी गटाचे २९ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविले. दबावाच्या राजकारणातून त्यांनी हा निर्णय घेतला. खरंतर सहकारातला हा काळा दिवस म्हणावा लागेल. महाडिक भ्यालेत म्हणून त्यांनी हा रडीचा डाव खेळला. त्यांनी लांग घातली होती तर सरळ कुस्ती खेळायची होती. महाडिकांनी थेट मैदानात उतरायचे होते, बावड्याचा पाटील कधीही मागे पडणार नाही, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी येथे दिले.

विरोधी गटाचे प्रमुख उमेदवार अपात्र ठरल्यानंतर त्यांनी अजिंक्यतारा येथे सभासदांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, बाबासाहेब चौगले, सुनील मोदी आदी उपस्थित होते.सतेज पाटील म्हणाले, राजाराम कारखान्याबाबत लोकांत जाऊन निवडणूक जिंकू शकत नाही हे समजल्याने महाडिकांकडून रडीचा डाव खेळण्यास सुरुवात झाली. हिंमत असेल तर लढा. सभासदांना निर्णय घेऊ दे. कुस्ती लढायचे असेल तर मर्दासारखी लढा. छाननीत २९ अर्ज जरी बाद झाले असले तरी इतर सर्वच गटांत आपले अर्ज शिल्लक आहेत. त्यामुळे भिण्याचे कारण नाही. पॅनेल पूर्ण क्षमतेने होणार आहे. कोणत्याही गटाची निवडणूक बिनविरोध होणार नाही. ही निवडणूक आता आपणास ताकतीने लढवायची आहे.

आता पाठ सोडणार नाही..चांगलं केलं..तुम्ही रडीचा डाव खेळला..मी राजाराम कारखान्यासाठी १४ तास राबणार होतो..आता २४ तास राबणार आहे. आता झोपणार नाही.. कुठल्या गावांत गेलो तर तिथेच वळकट घेऊन झोपणार, सकाळी उठून कामाला लागणार, परंतु तुमची पाठ सोडणार नाही, असे आमदार पाटील यांनी सांगितले. त्यावर सभासदांनी टाळ्या-शिट्यांचा गजर केला.

उच्च न्यायालयात जाणारअपात्र ठरविलेल्या २९ उमेदवारांच्याबाबत उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. सगळेच संपलेले नाही. न्यायदेवता बसलेली आहे. तेथे सत्याचा विजय होईल. येथे निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निर्णय घेतला असला तरी न्यायालयात शंभर टक्के आपल्या बाजूने न्याय होईल, तुम्ही काळजी करू नका. लढ्याची तयारी करा, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

एक्का माझ्याकडे.....सतेज पाटील म्हणाले, पत्ता त्यांनी टाकलाय मात्र डाव आम्हीच जिंकणार कारण त्यांनी जोकर टाकलाय, पण १२ हजार सभासद हा एक्का माझ्याकडे आहे. ही लढाई महाडिक आणि बंटी पाटील अशी नाही.. तर कोल्हापूरचे १२ हजार सभासद विरुद्ध येलूरचे ६०० सभासद अशी आहे. ही निवडणूक काहीही झाले तरी जिंकणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रचाराचा नारळ फोडणार...प्रत्येक गटात आपले उमेदवार आहेत, त्यामुळे कोणीही भिण्याचे कारण नाही. निवडणूक ताकतीने लढवायची आहे. येत्या शुक्रवार, शनिवारी प्रचाराचा नारळ फोडायचा आहे, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगताच सभासदांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलSugar factoryसाखर कारखानेAmal Mahadikअमल महाडिक