शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सामन्यासाठी निरोप समारंभ चुकवला

By admin | Updated: December 18, 2014 00:30 IST

यांनी घडविलाकोल्हापूरचा फुटबॉल...

एस.सी.सी वर्गाचा निरोप समारंभ शाळेत होता. माझे बंधू फुटबॉल चांगले खेळत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी मी जात असे. त्यात माझा फेव्हरेट संघ होता ‘शिवाजी’. त्यांचा सामना पाहण्यासाठी मी मॅट्रिकचा निरोप समारंभ चुकवला. पुढे याच संघातून माझी सीनियर संघात निवड झाली. त्यावेळच्या ज्येष्ठांनी माझी निवड केली. बलाढ्य शिवाजी विरुद्ध ‘बालगोपाल’यांच्यात सामना झाला. सामन्यात माजी आमदार बाबूराव धारवाडे चक्क गोलरक्षक म्हणून माझ्यासमोर उभे होते. असे एक ना अनेक किस्से ‘आठवणीतील फुटबॉल’ सामन्याविषयी शिवाजी तरुण मंडळाचे माजी फुटबॉलपटू व ज्येष्ठ प्रशिक्षक आप्पासाहेब वणिरे सांगत होते. १९५३ मध्ये मी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये त्यावेळच्या मॅट्रिक परीक्षेला बसलो होतो. शेवटचे शाळेतील दिवस होते. साधारणत: फेबु्रवारीचा महिना होता. प्रथेप्रमाणे शाळेत मॅट्रिक परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ ठेवला होता. मात्र, मी शिवाजी आणि प्रॅक्टिस क्लब यांचा सामना रावणेश्वर तळ्यात असल्याने मी त्या समारंभालाच जाणे टाळले. त्यामुळे पुढे शाळेतही मला बोल खावा लागला. इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्यामध्ये फुटबॉलचे आकर्षण ठासून भरले होते. १९५५ मध्ये बालगोपाल तालीम विरुद्ध आमच्या संघाचा सामना होता. समोर गोलरक्षक म्हणून बाबूराव धारवाडे होते. सामना रंगात आला होता. अटीतटीच्या सामन्यात मी गोल केला. हा सामना माझ्या फुटबॉल करियरमध्ये शेवटचाच ठरला. पुढे मी जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरीला लागलो. त्यामुळे फुटबॉल खेळापासून दूर गेलो. काही दिवसांनंतर मला फुटबॉलपासून दूर राहणे म्हणजे विरहासारखे वाटू लागले. त्यामुळे शिक्षकी पेशातील पुढचे शिक्षण घेऊन मी महाराष्ट्र हायस्कूलच्या माध्यमिक हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून १९७० पासून रूजू झालो. शिवाजी तरुण मंडळाकडून १५ वर्षे फुटबॉल खेळल्यानंतर मला जाणीव झाली की, आता आपल्या पेठेतील मुलांना फुटबॉलचे तांत्रिक धडे देऊन राज्य, राष्ट्रीय स्तरावर न्यायचे.मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठ येथील जी मुले अभ्यासात मंद, सामाजिकदृष्ट्या टाकाऊ, दंगेखोर, मारामाऱ्या, उनाडकी करणारी, शिक्षकांचा आदेश न मानणारी अशा मुलांना फुटबॉल खेळायला लावून मी पुढे आणले. त्यांच्यातील गुणवत्ता हेरून त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून दिला. आजही मी सायंकाळी शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामने पाहण्यास असतो. शाहू स्टेडियम म्हणजे ‘फुटबॉलची पंढरी’ आहे. - शब्दांकन : सचिन भोसले