Kolhapur: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या नावे फेक अकाउंटवरुन तरुणींशी गैरकृत्य, एकजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:47 IST2025-01-07T13:47:09+5:302025-01-07T13:47:40+5:30

मुरगूड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढल्याप्रकरणी करनूर ( ता. कागल) येथील ...

misdemeanors with young women on a fake account in the name of NCP Kolhapur District President, One in custody | Kolhapur: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या नावे फेक अकाउंटवरुन तरुणींशी गैरकृत्य, एकजण ताब्यात

Kolhapur: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या नावे फेक अकाउंटवरुन तरुणींशी गैरकृत्य, एकजण ताब्यात

मुरगूड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढल्याप्रकरणी करनूर ( ता. कागल) येथील एका तरुणाला मुरगूड पोलिसांनी अटक केली. या अकाउंटवरून या तरुणाने अनेक तरुणींशी शीतल फराकटे यांच्या नावाने चॅटिंग करून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. एका तरुणीच्या सजगतेने या भामट्याचा पर्दाफाश झाला आहे. तोहिद शेख (वय २६), रा. करनूर, असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांना एका तरुणीचा फोन आला होता. त्या तरुणीने तुम्ही दुसऱ्या तरुणाशी मला बोलावयास कसे सांगता असा जाब विचारला. यावेळी फराकटे गोंधळल्या, त्यांनी त्या तरुणीची विचारपूस करून सर्व माहिती समजून घेतली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. इन्स्टाग्रामवरून तुम्हीच मला दुसऱ्या मुलाशी बोलण्यास सांगत आहात, त्याचा फोन नंबर देत आहात हे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर शीतल फराकटे यांना आपले इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट असण्याची शंका आली.

त्यानंतर शीतल फराकटे यांनी आपले कार्यकर्ते व कुटुंबीयांच्या मदतीने फेक अकाउंट उघडणाऱ्या तोहिद शेखची माहिती घेतली. सोमवारी दुपारी त्यांनी मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तोहीदला फोन करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा फोन बंद लागत होता. दरम्यान, त्यानेच एक व्हिडीओ तयार करून आपण शीतल फराकटे यांचे फेक अकाउंट तयार केल्याचे कबूल करून आपण त्यांची माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला.

दरम्यान, तोहीदने फेक अकाउंटवरून पाठवलेला मजकूर डिलिट करून टाकला; पण याच अकाउंटवरून सातशे फॉलोअर केले असून, यातील अनेकांना शीतल फराकटे या नावाने त्याने संदेश पाठवले असणार, शिवाय अन्य काही मुलींच्या नावानेही फेक अकाउंट तयार करून गैरकृत्य केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी याचा सखोल तपास करून कडक कारवाई करावी, अन्य कोणी दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी फराकटे समर्थकांनी केली आहे.

Web Title: misdemeanors with young women on a fake account in the name of NCP Kolhapur District President, One in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.