Kolhapur: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या १० दुचाकी, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:14 IST2024-07-26T12:14:10+5:302024-07-26T12:14:41+5:30

वर्गातील मैत्री अन् चोरीचा कट

Minors steal 10 bikes for fun, police arrests three in Kolhapur | Kolhapur: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या १० दुचाकी, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Kolhapur: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या १० दुचाकी, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर : मौजमजा करण्यासाठी पैसे मिळावेत, यासाठी १७ वर्षीय तीन मित्रांनी गेल्या सहा महिन्यांत शहरातून १० दुचाकींची चोरी केली. सिद्धाळा गार्डन परिसरात विना नंबरप्लेट दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरताना तिघे जुना राजवाडा पोलिसांच्या हाती लागले.

गुन्हे शोध पथक गस्त घालताना सिद्धाळा गार्डन येथे विना नंबरप्लेट दुचाकीवरून आलेले तिघे दिसले. त्यांचे संशयास्पद वर्तन पाहून पोलिसांनी दुचाकी अडवली. नंबरप्लेटबद्दल विचारणा केली असता, त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी शहरातून दहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरीतील सात दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

वर्गातील मैत्री अन् चोरीचा कट

संशयित तिघे एकाच शाळेत शिकत होते. यातील दोघांनी नववीतून शाळा सोडली, तर एक जण दहावीत शिकत आहे. तिघांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरीचा कट रचला. त्यानुसार जानेवारी ते जून दरम्यान हँडल लॉक तोडून आणि बनावट चावीचा वापर करून १० दुचाकींची चोरी केली. मात्र, यातील एकाही दुचाकीची त्यांना विक्री करता आली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Minors steal 10 bikes for fun, police arrests three in Kolhapur