Kolhapur Crime: मुलाने 'रील' बनवले, पालकांना महागात पडले; नेमकं असं काय केलं... वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:15 IST2025-10-24T13:14:41+5:302025-10-24T13:15:16+5:30
गोकुळ शिरगाव : कोल्हापूर विमानतळ प्रतिबंध परिसरात एका अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास दिल्याबद्दल गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याच्या पालकाविरुद्ध गुन्हा ...

संग्रहित छाया
गोकुळ शिरगाव : कोल्हापूर विमानतळ प्रतिबंध परिसरात एका अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास दिल्याबद्दल गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याच्या पालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगा दुचाकी घेऊन गाडी चालवतानाचे फोटो आणि ''रील'' बनवत होता. त्याचवेळी पोलिस पेट्रोलिंग करत असताना तो पोलिसांना आढळून आला.
विमानतळ रोडवर गोकुळ शिरगाव पोलिस पेट्रोलिंग करत असताना एमएच ०९ जी. आर. ४८८१ क्रमांकाची दुचाकी एक अल्पवयीन मुलगा चालवताना आढळून आला. या घटनेनंतर, अल्पवयीन मुलास वाहन चालविण्यास दिल्याबद्दल त्याची आई शोभा विलास घस्ते (वय ४१, रा. तामगाव, ता. करवीर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. पोलिस निरीक्षक टी. जे. मगदूम यांनी ही कारवाई केली.
सोशल मीडियावर रील बनण्याचा ट्रेंड आहे. अनेकजण आपले फॉलोअर्स, लाईक मिळवण्यासाठी रील बनवतात. मात्र सद्या सायबर क्राईमचे गुन्हे वाढल्याने पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर आहे. भाईगिरी तसेच स्टंटगिरी करणाऱ्या अनेक रील स्टारना पोलिसांनी वेळीच अद्दल देखील घडवली आहे. त्यामुळे रील बनवताना काळजी घ्यावी अन्यथा तीच रील अंगलट येण्याची चिन्हे आहेत.