शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: महायुतीने सुनील मोदींच्या नावाला विरोध करण्याची तयारी केली; चंद्रकांतदांदांचा फोन आला..मोदींचा मार्ग सुकर झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:33 IST

आठ जणांची स्वीकृत सदस्यपदी निवड 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या यादीत काँग्रेस-उद्धवसेनेकडून सुनील मोदी यांच्या नावाच्या प्रस्तावाला महायुतीकडून महापालिका सभागृहात विरोध होण्याची शक्यता होती. मात्र, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोध करू नका, असा निरोप महायुतीतील कारभारी नगरसेवकांना दिल्याने सुनील मोदी यांचा ‘स्वीकृत नगरसेवक’पदाचा मार्ग सुकर झाला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महायुतीकडून पाच तर काँग्रेस-उद्धवसेनेकडून तीन जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. गतवेळच्या सभागृहात माजी महापौर सुनील कदम यांच्या स्वीकृत सदस्य निवडीवर तत्कालीन महाविकास आघाडीने आक्षेप घेतला होता. त्याचे उट्टे काढण्यासाठी महायुतीने सुनील मोदी यांच्या नावाला विरोध करण्याची तयारी चालविली होती.

वाचा: स्विकृत नगरसेवकपदावरून खडाजंगी; मोदी-देवकुळे यांच्यात वाद उफाळला, सुनील मोदी म्हणाले..शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीवेळी मोदी यांच्या नावाला महायुतीकडून विरोध होईल अशी शक्यता असताना महायुतीने मात्र, त्यांच्या नावाला आक्षेप घेतला नाही. सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी महायुतीच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीवेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोन करून मोदी यांच्या नावाला आक्षेप न घेण्याच्या सूचना कारभारी नगरसेवकांना दिल्या. त्यामुळे मोदी यांची विनासायास स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली.

हे झाले स्वीकृत नगरसेवककाँग्रेस : सुनील मोदी, राहुल माने, मुश्ताक मलबारी.भाजप : सुनील वाडकर, विजय जाधव, प्रा.जयंत पाटीलशिंदेसेना : रत्नेश शिरोळकर, प्रसाद चव्हाण.

स्वीकृत नगरसेवकांनी उधळला गुलालसर्वसाधारण सभेत स्वीकृत आठ नगरसेवकांच्या नावाला एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांनी महापालिकेच्या चौकात फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली तसेच आपापल्या प्रभागात मिरवणूक काढली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Politics: Sunil Modi's Path to Corporator Smoothed by Mahayuti Support.

Web Summary : Chandrakant Patil's intervention ensured Sunil Modi's unopposed selection as corporator in Kolhapur. Mahayuti, initially planning opposition, withdrew following Patil's instructions, facilitating Modi's easy win. Celebrations followed.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुतीchandrakant patilचंद्रकांत पाटील