शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

वडगावात भरला मिनी बाजार: खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

पेठवडगाव: दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊननंतर नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली.त्यामुळे वडगावचा आठवडी बाजार बंद असला तरी मिनी बाजार भरला.यामध्ये ...

पेठवडगाव: दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊननंतर नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली.त्यामुळे वडगावचा आठवडी बाजार बंद असला तरी मिनी बाजार भरला.यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग व विनामास्क नागरिक रस्त्यावर उतरल्यामुळे शासकीय आदेश व स्वयंशिस्तीचा फज्जा उडाला.आज शहरात आठ कोरोनाबाधित रुग्ण मिळून आले.तर शहरातील १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दोन दिवस बंद तसेच गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी झाली होती.नेहमी सोमवारी खरेदीला जायचे हा येथील नागरिक व महिलांचा पायंडा आहे.त्यामुळे सकाळपासून खरेदीसाठी गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.एसटी स्टॅण्ड, धान्य लाईन, भाजी मंडई, पद्‍मारोडवर गर्दीचा उच्चांक रात्री उशिरापर्यंत होता.तर सरसकट दुकाने ही सुरू होती.

याप्रकरणी पोलिसांनी नेहमीप्रमाणे कारवाईचा धडाका लावला.तर ध्वनिक्षेपकावरून कोरोना विषयक नियमांची माहिती पालिका,पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत होती; मात्र यास नागरिक दाद देत नव्हते.

पालिकेच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांची माहिती देण्यात येते.यामध्ये आज ८ व १८ जणांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी अनधिकृत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

आज पोलीस प्रशासनाने पालिका मदतीने २० जणांवर विनामास्क कारवाई केली.पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले.

फोटो ओळ: पेठवडगाव येथील पद्मारोडवर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.(छाया: संतोष माळवदे)