शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरणाच्या सूचना

By admin | Updated: August 3, 2014 00:58 IST

चिपळूण तालुका : माळीणनंतर डोंगरकडेच्या गावांबाबत प्रशासन दक्ष

चिपळूण : पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडलेल्या दुर्घटनेनंतर डोंगर पायथ्यालगत असलेल्या गावांचा सर्व्हे सुरु करण्यात आला असून यापूर्वीच तालुक्यातील १९ गावातील ग्रामस्थांना संभाव्य धोका लक्षात घेवून सूचना देण्यात आल्या असल्याचे तहसीलदार वृषाली पाटील यांनी सांगितले. माळीण गावच्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर मुनष्यहानी झाली. त्यामुळे राज्यभर डोेंगरालगत असलेल्या गावांचा सर्व्हे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक तहसिलदार कार्यालयांना देण्यात आले आहे. त्यानुसार तहसिलदार कार्यालयामार्फत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. राजापूर तालुक्यात यापूर्वीच शिवणेबुद्रूक आणि वडदहसोळ गावात भूस्खलनाचा मोठा धोका पचवावा लागला आहे. शिवणेबुद्रूक येथे तर दरड कोसळून काही लोक गाडले गेले होते. मात्र या जुन्या घटनांतूनही बोध घेण्यात आलेला नाही. आता माळीण गावी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने पावले उचलली आहेत. धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यात १९ गावात धोकादायक स्थिती असल्याने किंवा यापूर्वी तेथे दुर्घटना घडली असल्याने येथील ग्रामस्थांनी स्थलांतर करावे, अशा आशयाच्या सूचना आपण यापूर्वीच दिल्या आहेत. पुन्हा या गावातील लोकांना सतर्क करण्यात येणार आहे. सध्या पाऊस बेताचा असल्याने धोकादायक स्थिती नाही तरीही महसूल यंत्रणा सतर्क आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भूस्खलांचा धोका असलेल्या गावांचा सर्व्हे सुरु आहे असेही तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)