Kolhapur: ४० फुटावरून खाली पडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू, भोगावती कारखान्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:21 IST2025-04-24T18:21:36+5:302025-04-24T18:21:57+5:30
भोगावती : शाहूनगर-परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उचलत असलेल्या क्रेनचे काम करताना तोल जावून पडल्याने परप्रांतीय ...

Kolhapur: ४० फुटावरून खाली पडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू, भोगावती कारखान्यातील घटना
भोगावती : शाहूनगर-परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उचलत असलेल्या क्रेनचे काम करताना तोल जावून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बिहारच्या चंपाअरण्य जिल्ह्यातील छोटनकूमार ज्ञनदेव सहनी (वय २५ रा. थलभितीया, ता. मझौलिया) असे मृताचे नाव आहे. आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
भोगावती साखर कारखान्याचा सध्या गळीत हंगाम संपल्याने कारखान्यातील विविध विभागातील कामे केली जात आहेत. ज्या ठिकाणी पत्रे खराब झालेले आहेत ते बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम ठेकेदारी पद्धतीने हेळेवाडी (ता. राधानगरी) येथील एस. के. पाटील यांना दिले आहे. पाटील त्यांच्याकडे छोटनकुमार कामासाठी होता.
गुरुवारी कारखान्यातील ऊस उतरण्यासाठी ज्या ठिकाणी क्रेन वापरली जाते त्या ठिकाणी पत्र्याचे काम केले जात होते. ते काम करण्यासाठी छोटनकूमार चढला होता. अचानक तोल गेला आणि जवळपास चाळीस फुटावरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.