कोल्हापुरात एम.ई.एस. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत पोदार, माईसाहेब, विबग्योर, संट झेविअर्सची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 03:20 PM2017-12-15T15:20:27+5:302017-12-15T15:31:44+5:30

कोल्हापुरात महावीर एज्युकेशन सोसायटीतर्फे ५ आयोजित केलेल्या एम.ई.एस. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी पोदार इंटरनॅशनल स्कूल, माईसाहेब बावडेकर स्कूल , विबग्योर स्कूल, सेंट झेविअर्स स्कूल यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत स्पर्धेत आगेकूच सुरु ठेवली. शाहू स्टेडीयमवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहील्या सामन्यांत पोदार इंटरनॅशनल स्कूलने अटीतटीच्या लढतीत दुधगंगा व्हॅली स्कूलचा २-१ असा पराभव  केला.

MES in Kolhapur In the inter-party football tournament, Poddar, Maisaheb, Vibugor, Sanjay Lecce forward | कोल्हापुरात एम.ई.एस. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत पोदार, माईसाहेब, विबग्योर, संट झेविअर्सची आगेकूच

कोल्हापुरात एम.ई.एस. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत पोदार, माईसाहेब, विबग्योर, संट झेविअर्सची आगेकूच

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापुरात शाहू स्टेडीयमवर एम.ई.एस. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत अटीतटीच्या लढतीलिटल फ्लॉवर संघाचा २-० असा पराभवदुधगंगा व्हॅली स्कूलचा २-१ असा पराभव  बावडेकरकडून शिवराज भोसलेने तीन गोल नोंदवत हॅट्रीकराधाबाई शिंदे स्कूलचा ४-० असा पराभव  शेवटच्या सामन्यांत न्यू मॉडेलवर २-० अशी मात

कोल्हापूर : महावीर एज्युकेशन सोसायटीतर्फे ५ आयोजित केलेल्या एम.ई.एस. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी पोदार इंटरनॅशनल स्कूल, माईसाहेब बावडेकर स्कूल , विबग्योर स्कूल, सेंट झेविअर्स स्कूल यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत स्पर्धेत आगेकूच सुरु ठेवली. 


शाहू स्टेडीयमवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहील्या सामन्यांत पोदार इंटरनॅशनल स्कूलने अटीतटीच्या लढतीत दुधगंगा व्हॅली स्कूलचा २-१ असा पराभव  केला. यात पोदारकडून राजदीप कदम, अभिषेक सातपुते , तर  दुधगंगाकडून देवराज चोपदारने एकमेव गोलची नोंद केली.

दुसऱ्या सामन्यांत माईसाहेब बावडेकर स्कूलने राधाबाई शिंदे स्कूलचा ४-० असा पराभव  केला. बावडेकरकडून शिवराज भोसलेने तीन गोल नोंदवत हॅट्रीक केली. संघाचा चौथा गोल स्वयंम हवालदारने केला.

तिसऱ्या सामन्यांत विबग्योर स्कूलने लिटल फ्लॉवर संघाचा २-० असा पराभव  केला. विबग्योरकडून हर्ष कुंभोजकर व अंशुल देशमुख यांनी गोल नोंदवले. शेवटच्या सामन्यांत सेंट झेविअर्सने न्यू मॉडेलवर २-० अशी मात केली. सेंट झेविअर्सकडून सार्थ सनदी, अरमान मुल्ला यांनी गोल नोंदवले .

Web Title: MES in Kolhapur In the inter-party football tournament, Poddar, Maisaheb, Vibugor, Sanjay Lecce forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.