शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मेघोली लघुपाटबंधारे तलाव फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी - मेघोली, ता. भुदरगड येथील लघुपाटबंधारे तलाव रात्री साडेदहाच्या सुमारास फुटला. हा तलाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी - मेघोली, ता. भुदरगड येथील लघुपाटबंधारे तलाव रात्री साडेदहाच्या सुमारास फुटला. हा तलाव फुटल्याने नदीकाठी असलेल्या पाण्याच्या मोटारी वाहून गेल्या. शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले आहे.

भुदरगड तालुक्याच्या दक्षिणेला मेघोली गाव आहे. या गावाला नदी नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी डोंगरालगत ९८ दलघफू क्षमतेचा मातीचा लघुपाटबंधारे तलाव बांधला आहे. हा तलाव तेथील ओढ्यांवर बांधलेला आहे. या तलावाच्या पाण्याखाली ११ लघुबंधारे असून, ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास पाण्याच्या आउटलेटजवळून बंधारा फुटला. बंधारा फुटल्याने गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेकडो एकर जमिनीवरील पिके आणि माती या पाण्याने धुऊन जाणार आहे. हे धरण फुटल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. सुदैवाने गाव बाजूला असल्याने जीवितहानी झाल्याची घटना घडली नाही. या गावाला पाण्यापासून धोका संभवत नाही. धरण फुटल्याने गावात गोंधळाचे वातावरण पसरले आहे. या धरणाच्या पाण्यामुळे वेदगंगेच्या नदीपात्रात फारसे पाणी वाढण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पाण्याचा विसर्ग अतिजलद झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप आणि काळोख असल्याने काहीही दिसत नव्हते. मोबाईल फोन्सना रेंज नसल्याने संपर्कात अडथळे निर्माण होत आहेत. तालुक्यातील इतर ठिकाणचे अनेक नातेवाईक चौकशीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते, पण संपर्क होत नव्हता. येत्या उन्हाळ्यात या भागातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्यावाचून वाळणार आहेत. धरण फुटल्याची वार्ता समजताच तहसीलदार अश्विनी अडसूळ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सहायक पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख त्यांचे सहकारी पोलीस, पोलीस पाटील, तलाठी, मंडल अधिकारी राजे शिर्के घटनास्थळी दाखल झाले होते.