शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणाबाबत आज बैठक

By admin | Updated: April 7, 2017 01:03 IST

सर्किट बेंच आंदोलन : कृती समिती करणार चर्चा; आंदोलन स्थगित शक्य

कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची पुढील दिशा ठरविण्यासाठी खंडपीठ कृती समिती आणि सर्वपक्षीय खंडपीठ नागरी कृती समितीने आज, शुक्रवारी दुपारी चार वाजता संयुक्त बैठक आयोजित केली आहे. न्यायसंकुलातील शाहू सभागृहात होणाऱ्या बैठकीत समिती ही सभासदांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी गुरुवारी दिली. गुरुवारच्या साखळी उपोषणाची सांगता असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्या हस्ते करण्यात आली.कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी येथील वकिलांचे सन २०१० पासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून दि. १ डिसेंबर २०१६ पासून न्यायसंकुलासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची दखल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार बुधवारी विधानभवनामध्ये कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक झाली. यामध्ये त्यांनी कोल्हापुरातील सर्किट बेंचसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना एक आठवड्यात भेटून किंवा पत्र देऊन विनंती केली जाईल, अशी ग्वाही दिली. शिवाय त्यांनी साखळी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन खंडपीठ कृती समितीला केले. या आवाहनानुसार उपोषणाबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्यात येईल, असे अध्यक्ष मोरे यांनी सांगितले. दरम्यान, साखळी उपोषणाच्या १२७ व्या दिवशी गुरुवारी कोल्हापुरातील वकिलांचे लेखनिक (क्लार्क) या आंदोलनात सहभागी झाले. त्यांचे उपोषण माजी अध्यक्ष घाटगे यांच्या हस्ते सरबत देऊन सोडण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोरे, उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी अध्यक्ष अशोक पाटील, विजय पाटील, के. के. सासवडे, कल्पना पाटील, मेघा पाटील, धैर्यशील पवार, आदी उपस्थित होते. आंदोलनात नथुराम साळवी, अनिल सावंत, कृष्णात कदम, किशोर साळोखे, चंद्रकांत पाटील, प्रताप पाटील, रमेश बागणे, निवास निकम, प्रशांत कांबळे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांकडून मंत्रालयात पाठपुरावा : मोरेमुंबईत काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर पुढील कार्यवाहीसाठी गुरुवारी मंत्रालय आणि विधि व न्याय विभागात दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पाठपुरावा केल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, साखळी उपोषणाबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी आज, शुक्रवारी कृती समितीची बैठक होणार आहे. यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील असोसिएशनचे पदाधिकारी, सभासद उपस्थित राहतील. बैठकीमध्ये मागणीच्या पूर्ततेसाठी सरकारला ठरावीक कालावधी देणे आणि गेल्या १२७ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण हे स्थगित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे.