शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग आयुक्तांकडून बैठकीची हालचाल

By admin | Updated: September 3, 2016 00:55 IST

ऊर्जितावस्थेवर चर्चा होणार : यंत्रमागधारक संघटना, आमदार, खासदारांच्या प्रयत्नांचा परिपाक

राजाराम पाटील-- इचलकरंजी --यंत्रमाग उद्योगातील आर्थिक मंदी व अन्य समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाकडून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील यंत्रमाग केंद्र कार्यक्षेत्रातील खासदार व यंत्रमागधारक संघटनांची बैठक मुंबई येथे बोलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. अभूतपूर्व मंदीचे वातावरण असल्याने यंत्रमाग उद्योगास सरकारने ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, या मागणीसाठी संबंधित संघटना, आमदार व खासदार प्रयत्न करीत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून ही बैठक बोलविण्यात येत आहे.यंत्रमाग उद्योगामध्ये गेले वर्षहून अधिक काळ अभूतपूर्व मंदीचे सावट आहे. महाराष्ट्रात तेरा लाख यंत्रमाग असल्यामुळे मंदीचा फटका राज्यातील सर्वच यंत्रमाग केंद्रांना बसला आहे. २६ जुलैला इचलकरंजीतील यंत्रमागधारकाने कर्जास कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर यंत्रमागधारकांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.यंत्रमाग उद्योगातील मंदीबाबत विचारविनिमय करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रयत्नाने २२ आॅगस्ट रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीसाठी देशातील यंत्रमाग केंद्राशी निगडित असलेले खासदार व त्याठिकाणी कार्यरत असलेले यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तेव्हा यंत्रमाग उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकार प्रयत्न करेल. मात्र, यंत्रमागांच्या असलेल्या समस्या वेगवेगळ्या असल्यामुळे विभागवार बैठका घेऊन यंत्रमागधारकांच्या समस्या व प्रश्न यांचे निराकरण करण्यात येईल, असे दिल्लीतील बैठकीमध्ये मंत्री इराणी यांनी जाहीर केले होते.त्याच्यापाठोपाठ २७ आॅगस्टला आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नाने राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी इचलकरंजीत येऊन वस्त्रोद्योग परिषद घेतली. या परिषदेमध्ये देशमुख यांनी यंत्रमागधारकांच्या समस्यांबाबत सरकारला सहानुभूती आहे, असे स्पष्ट करताना ताबडतोबीचा उपाय म्हणून छोट्या यंत्रमागधारकाला एक रुपये प्रतियुनिट वीज दराची सवलत आणि यंत्रमाग कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जावर पाच टक्के व्याज दराचे अनुदान देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. वीज दर व कर्जावरील व्याज अनुदान याची अंमलबजावणी सरकारकडून त्वरित व्हावी, अशी अपेक्षा यंत्रमागधारकांकडून व्यक्त होत आहे.केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री इराणी यांनी दिल्लीतील बैठकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुंबई आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीतील विभागाशी निगडित असलेल्या यंत्रमाग केंद्रातील खासदार व यंत्रमागधारक संघटना यांची सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या बैठकीकडे यंत्रमाग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.