पाखऱ्याच्या वाढदिवसाला ४०० लाेकांचे जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:37+5:302021-02-05T06:54:37+5:30
भादोले : सध्याच्या काळात माणूस माणसापासून दूर होऊन नातीगोती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना भादोले (ता. हातकणंगले) येथील शंकर ...

पाखऱ्याच्या वाढदिवसाला ४०० लाेकांचे जेवण
भादोले : सध्याच्या काळात माणूस माणसापासून दूर होऊन नातीगोती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना भादोले (ता. हातकणंगले) येथील शंकर पाटील यांच्या कुटुंबियांनी आपल्या लाडक्या ‘पाखऱ्या’ या बैलाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात साजरा करून आगळा वेगळा संदेश समाजात देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाची परिसरात चर्चा आहे.
या कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आवर्जून उपस्थिती लावली. पाटील कुटुंबियांनी पाखऱ्याच्या वाढदिवसानिमित्त ४०० लोकांना जेवण घातले. तर वाढदिवसाला आलेल्या मित्रमंडळींनी गिफ्ट म्हणून पाखऱ्याला सापती, झूल, वेसण, दोरखंड, शिवदा आदी वस्तू घेऊन आले होते. आपल्या लेकरापेक्षाही बळीराजाने या मुक्या जनावरांना लावलेला लळा परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
०२ भादोले
भादोले येथे शंकर पाटील यांच्या बैलाच्या वाढदिवसाला माजी खा. राजू शेट्टी उपस्थित होते.