Kolhapur Crime: पिस्तूल शोधताना सापडले २६ लाखांचे एमडी ड्रग्ज, मनीष नागोरीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:51 IST2026-03-07T11:50:19+5:302026-03-07T11:51:06+5:30

चार जिवंत काडतुसेही सापडली, शहापूर पोलिसांची यड्रावमध्ये कारवाई

MD drugs worth Rs 26 lakhs found while searching for pistol, Manish Nagori arrested | Kolhapur Crime: पिस्तूल शोधताना सापडले २६ लाखांचे एमडी ड्रग्ज, मनीष नागोरीला अटक

Kolhapur Crime: पिस्तूल शोधताना सापडले २६ लाखांचे एमडी ड्रग्ज, मनीष नागोरीला अटक

इचलकरंजी : कुख्यात आंतरराज्य पिस्तूल तस्कर मनीष ऊर्फ मन्या रामविलास नागोरी (वय ३६, रा. प्रियदर्शनी हौसिंग सोसायटी, यड्राव, ता. शिरोळ) याला त्याच्या घरातून शहापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २६ लाखांच्या ८६५ ग्रॅम मेफेड्रोन एमडी ड्रग्जसह चार जिवंत काडतुसे, एक चारचाकी, असा ३० लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्ह्याची व्याप्ती पाहता हा गुन्हा पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमुळे इचलकरंजीसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

शहरात दोन दिवसांपूर्वी सांगली रोडवर गोळीबाराची घटना घडली. या घटनेत वापरलेल्या पिस्तूलचा शोध घेण्याच्या निमित्ताने नागोरी याच्याकडे तपास करण्यासाठी शहापूर पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले. त्यावेळी त्याने अर्धा तास पोलिसांना बाहेर ताटकळत ठेवले. त्याच्या संशयास्पद हालचाली पाहता पोलिसांना त्याच्यावर अधिकच संशय बळावला. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना दोन हजार किमतीची चार जिवंत काडतुसे हाती लागली.

याबाबतची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक जाधव व उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही तेथे पोहोचले. संपूर्ण घराची झडती घेऊनही पिस्तूल सापडत नसल्याने पोलिसांनी वाहनांच्या तपासणीचा निर्णय घेतला.

पोलिसांनी त्याच्या चारचाकी व दुचाकी वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये प्लास्टिक पिशवीत ठेवलेला १४३ ग्रॅम वजनाचा ४ लाख २९ हजार रुपये किमतीचा मेफेड्रोन मिळून आला. दुसऱ्या गाडीत ७२२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन मिळून आला. त्याची किंमत २१ लाख ५५ हजार आहे. पोलिसांनी या कारवाईत एक चारचाकी, एक दुचाकी, इलेक्ट्रिक वजनकाटा, डीव्हीआर, असा एकूण ३० लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नागोरी याला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू असून, त्याने हे अमली पदार्थ कोठून आणले? पुढे कोणाला दिले जातात, या साखळीची तपासणी केली जाणार आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

नागोरीच्या घराच्या परिसरातही होणार तपास

नागोरी याने पोलिसांना अर्धा तास घरामध्ये येऊ दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला होता. घरामध्ये केलेल्या तपासणीमध्ये फक्त चार जिवंत काडतुसे मिळाली, पण पिस्तूल मिळाले नाही. त्याने पोलिसांना अडवून ठेवलेल्या अर्ध्या तासाच्या कालावधीत काहीतरी संशयास्पद हालचाली केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे घराच्या परिसरात त्याने काही फेकून दिले अथवा लपवून ठेवले आहे काय, याचाही तपास केला जाणार आहे.

Web Title : कोल्हापुर अपराध: 26 लाख का एमडी ड्रग्स जब्त, मनीष नागोरी गिरफ्तार

Web Summary : इचलकरंजी में पुलिस ने मनीष नागोरी को गिरफ्तार कर ₹30.22 लाख का एमडी ड्रग्स, जिंदा कारतूस और एक कार जब्त की। नागोरी ने पुलिस को देरी से प्रवेश दिया, जिससे संदेह हुआ। ड्रग नेटवर्क की जांच जारी है।

Web Title : Kolhapur Crime: MD Drugs worth 2.6 million seized, Nagori arrested.

Web Summary : Police arrested Manish Nagori in Ichalkaranji, seizing ₹30.22 lakh worth of MD drugs, live cartridges, and a car. Nagori delayed police entry, raising suspicion. Investigation continues to uncover the drug network's source and distribution.