शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दीपावलीसाठी बाजारपेठा सज्ज

By admin | Updated: October 9, 2014 00:47 IST

यंदा बोनसही वेळेत : बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण

कोल्हापूर : अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावली सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. सर्व उद्योगांनी दिलेला बोनस, यंदाच्या दिवाळीत मागील वर्षीपेक्षा बाजारातील उलाढाल अधिक होण्याचा अंदाज बांधून तयार फराळ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, धान्य व्यापारी, कपडे व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात माल मागविला आहे. यंदाची दीपावली बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण घेऊन आली आहे. जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला पडल्याने शेती उत्पादन चांगले झाले आहे. यामुळे बळिराजाही सुखावला आहे. असे असले तरी मात्र, उसाचा हप्ता निवडणुकांमुळे जाहीर झालेला नाही. त्यामुळे काही प्रमाणात बळिराजा पावसाकडून सुखावला असला तरी कारखान्यांच्या ऊसदराच्या घोषणा न झाल्याने नाराजी आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठांवर होत आहे. शहरातील महत्वाच्४या असलेल्या राजारामपुरी, महाद्वार रोड, शाहुपुरी आदी मुख्य बाजारपेठ व मॉल येथे शेतकरी, नोकरदार व कामगार वर्गाकडून सोने, वाहन, कपडे, इलेक्ट्रॉनिकच्या विविध वस्तू व किराणा बाजारात मोठी उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश कामगार व नोकरदार वर्गांचा पगार अधिक बोनस आज, बुधवारी झाल्याने बाजारपेठेत सायंकाळी काही प्रमाणात गर्दी होती. (प्रतिनिधी)स्मार्ट फोनची रेंज वाढलीयंदा अनेक प्रकारचे स्मार्ट फोन बाजारात आले आहेत. चिनी बनावटीसह अनेक ब्रँड बाजारात आले आहेत. किमतीही अगदी अडीच हजारांपासून लाखांपर्यंत आहेत. दिवाळी कॅश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे, हव्या त्या किमतीचे मोबाईल फोन बाजारात आणले आहेत. - रवि भानुसे (स्वयंभू कम्युनिकेशन)‘एलईडी’ची चलतीइलेक्ट्रॉनिक बाजारात सध्या एलईडी चलती आहे. साडेसात हजार ते तीन लाख रुपयांपर्यंतच्या एलईडींना ग्राहकांतून मोठी मागणी आहे. यंदाची दिवाळी कॅश करण्यासाठी कंपन्यांनी नवनवीन ओव्हन, फ्रिज, म्युझिक सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स सुर्इंग मशीनची नवी रेंजही बाजारात आणली आहे. - कश्यप शहा (नॉव्हेल होम अ‍ॅप्लायन्सेस)तयार फराळाला मागणी नोकरदार महिलांना घरी वेळ नसल्याने फराळाचे जिन्नस तयार घेण्याकडे कल वाढला आहे. तयार पदार्थांमध्ये करंजी, लाडू, चकली, पुडाची वडी, बुंदीचे लाडू या पदार्थांना मोठी मागणी असते. किलोचे भाव अद्यापही ठरविलेले नाहीत. सध्या आॅर्डर घेण्याचे काम सुरू आहे. - सुजाता भोसले (फराळ विक्रेत्या)