शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांमधील ‘बीओटी’ कामावर आता ‘पणन’चा अंकुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील बाजार समित्यांच्या उत्पन्नवाढीसाठी पणन मंडळाने ‘स्वारस्य अभियोक्ती’ ही संकल्पना सुरू केली ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील बाजार समित्यांच्या उत्पन्नवाढीसाठी पणन मंडळाने ‘स्वारस्य अभियोक्ती’ ही संकल्पना सुरू केली आहे. मात्र, यामध्ये अनियमितता आढळून येत असल्याने आता ‘पणन’ने दिलेल्या नियमावलीतच काम करावे लागणार आहे. गाळेवाटपासह इतर कामांमध्ये संचालकांच्या हस्तक्षेपाला लगाम बसणार आहे.

बाजार समित्यांच्या आवारात विविध विकासकामे स्वनिधीतून केली जातात. समित्यांकडे पुरेसा निधी उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अथवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन काम सुरू असते. मात्र, काही बाजार समित्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता, पणन मंडळ अथवा वित्तीय संस्थांकडून त्यांना कर्जपुरवठा केला जात नाही. त्यामुळे निधीअभावी विकासकामे करता येत नाहीत. अशा बाजार समित्यांसाठी राज्य शासनाने ‘स्वारस्य अभियोक्ती’द्वारे निधी संकल्पना आणली. यातून समित्यांना निधी मिळून व्यापारी गाळ्यांसह इतर विकासकामे करता येतात.

व्यापारी गाळ्यांसह इतर कामांतून समित्यांचे उत्पन्न वाढू शकते. मात्र, स्वारस्य अभियोक्ती प्रक्रिया राबविताना समित्यांच्या पातळीवर सुसूत्रता दिसत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. ‘बीओटी’वर गाळे बांधले तर ते भाडेपट्ट्याने देताना संचालकांचा हस्तक्षेप होतो आणि मूळ हेतूला बाधा येते, असा अनुभव काही समित्यांच्या बाबतीत आला आहे. त्यामुळे पणन मंडळाने यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी कडक नियमावली केली आहे.

संचालक मंडळाच्या संबंधित आहे म्हणून काम करण्याचा ठेका देता येणार नाही. बाजार समितीने संचालक मंडळाच्या ठरावांसह पणन मंडळाकडे अर्ज करायचा आहे. जागेचा मंजूर नकाशा, बांधकामाचा आर्किटेक्टने प्रमाणित केलेला नकाशा, आदी कागदपत्रांसह जिल्हा उपनिबंधकांचा अभिप्रायही महत्त्वाचा राहणार आहे. बांधकाम देताना बाजारभावाप्रमाणे भाडे व अनामत रक्कम निश्चित करायची आहे. या निर्णयामुळे बाजार समित्यांच्या बांधकामात ‘अर्थ’ शोधणाऱ्यांवर वचक राहणार आहे.

व्यापारी गाळ्यांचा जाहीर लिलाव

व्यापारी गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते भाड्याने देताना त्याचा जाहीर लिलाव करायचा आहे. लिलावाची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधकांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या समोरच करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे आता संचालकांच्या मनमानीला चाप बसणार आहे.