शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात १५ आॅक्टोबरला मराठा क्रांती मोर्चा

By admin | Updated: September 8, 2016 00:30 IST

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आयोजन : समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर : कोपर्डी येथे मराठा समाजातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व अन्य मागण्यांसाठी समाजबांधवांतर्फे १५ आॅक्टोबरला कोल्हापुरात मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी टेंबे रोडवरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या प्राथमिक नियोजन बैठकीत देण्यात आली. यावेळी मराठा समाजातील विविध संघटनांच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित होते.कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, आरोपींना फाशींची शिक्षा द्यावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी सकल मराठा म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.गेल्या सत्तर वर्षांत सर्वच क्षेत्रांत मराठा समाजाची अधोगती होत आहे. त्याला उभारी देण्यासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईतोपर्यंत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ स्थापन करून सरकारने त्यास पाच हजार कोटींचा निधी द्यावा, अशा मागण्याही मोर्चावेळी करण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले व सूचना मांडल्या. त्यामध्ये मोर्चाच्या यशस्वीतेसाठी व शिस्तबद्ध नियोजनासाठी विविध समित्या नेमण्यावर चर्चा झाली. निधी गोळा करणे, वैद्यकीय मदत, सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजबांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यूहरचना, शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था, कर्मचारी संघटना यांच्या सहभागासाठी प्रत्यक्ष भेटी देऊन सहभागासाठी विनंती करणे, आदी सूचनांचा समावेश होता. तसेच गणेशोत्सव काळात तरुण मंडळे, तालीम संस्था व गावोगावी पत्रकांद्वारे व तालुकास्तरीय समिती नेमून प्रबोधन करण्यात येणार आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी लवकरच व्यापक बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार असून, या मोर्चात पंधरा लाख समाजबांधव सहभागी होतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)असे असेल स्वरूप मोर्चाच्या सुरुवातीला मुली व युवती असतील. त्यानंतर महिला व सर्वांत शेवटी पुरुष व विविध समाज संघटनांचे पदाधिकारी असतील. त्यानंतर समाजातील पाच मुलींच्या हस्ते मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. कोल्हापुरात बुधवारी टेंबे रोडवरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सकल मराठा समाजातर्फे आॅक्टोबरमध्ये काढण्यात येणाऱ्या मूकमोर्चाच्या नियोजनासंबंधी प्राथमिक बैठक झाली. त्यामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.