Kolhapur ZP Election 2026: आधे इधर, आधे उधर... उमेदवारीसाठी दिवसभर पक्षांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:59 IST2026-01-22T15:57:27+5:302026-01-22T15:59:03+5:30

राहुल आवाडे यांच्या पत्नी, कन्या निवडणूक रिंगणात

Many leaders switched parties for Kolhapur Zilla Parishad, Panchayat Samiti elections | Kolhapur ZP Election 2026: आधे इधर, आधे उधर... उमेदवारीसाठी दिवसभर पक्षांतर

Kolhapur ZP Election 2026: आधे इधर, आधे उधर... उमेदवारीसाठी दिवसभर पक्षांतर

कोल्हापूर : सकाळी एका पक्षात प्रवेश केलेला नेता, कार्यकर्ता संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात गेल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी पाहावयास मिळाले. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात घाऊक पद्धतीने पक्षांतर झाल्याचे पाहावयास मिळाले. ‘उमेदवारी मिळत नाही तर कर पक्षांतर’ या सूत्रानुसार पक्षांतरांचा हा कार्यक्रम दिवसभर वेगवेगळ्या तालुक्यात आणि कोल्हापुरातही सुरू राहिला.

गेले काही महिने प्रलंबित असलेला जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांचा भाजप प्रवेश बुधवारी झाला असून, गडहिंग्लजमध्ये आता भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार)विरोधात शड्डू ठोकला आहे. नेसरी गटातून उमेदवारी मिळणार नसल्याने भाजपचे संग्रामसिंह कुपेकर यांनी सकाळी राष्ट्रवादी (शरद पवार)त, तर दुपारनंतर राष्ट्रवादी (अजित पवार)त प्रवेश केला.

राजकुमार हत्तरकी यांचे चिरंजीव शिवशंकर यांनीही हलकर्णीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी (अ. प.)त प्रवेश केला. त्यांच्या मातोश्री दिवंगत रेखाताई या गेल्या सभागृहात ताराराणी आघाडीतून विजयी झाल्या होत्या. काँग्रेस नेत्या अंजना रेडेकर यांचे चिरंजीव नूलच्या उमेदवारीसाठी जनसुराज्यमध्ये गेले आहेत. आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहायक सुहास राजमाने यांच्यासाठी रुई मतदारसंघ न सुटल्याने त्यांना भाजपच्या चिन्हावर उभे करण्यात येणार आहे.

माघारीदिवशी दुसरा अंक

आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षप्रवेशाची बुधवारी माळ लागली. याच पद्धतीने आता माघारीदिवशी म्हणजे २७ जानेवारीला या घडामोडींचा दुसरा अंक पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांमध्ये राजकीय घडामोडींना आणखी ऊत येणार आहे.

आवाडे कुटुंबीय चर्चेत

आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका यांनी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून बुधवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, आवाडे यांच्या पत्नी मौश्मी यांनीही रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून अर्ज भरल्याने दिवसभर याची चर्चा सुरू होती.

Web Title : कोल्हापुर जिला परिषद चुनाव: उम्मीदवारी के लिए दलबदल की होड़

Web Summary : कोल्हापुर में नामांकन के अंतिम दिन नेताओं और कार्यकर्ताओं ने जिला परिषद और पंचायत समिति चुनावों में उम्मीदवारी के लिए दल बदले। आवाडे परिवार भी कई नामांकन दाखिल करने के कारण चर्चा में है।

Web Title : Kolhapur ZP Election Sees Mass Party Switching for Candidacy

Web Summary : Kolhapur witnessed widespread party switching on the last day for nominations. Leaders and workers changed affiliations seeking candidacy for Zilla Parishad and Panchayat Samiti elections. The आवाडे family is also in the spotlight due to multiple filings.