शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनसुख हिरेन प्रकरण म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का?-मुश्रीफ यांचा एनआयएला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 19:13 IST

Politics Hasan Musrif Kolhapur : मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टेलिया या घरासमोर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील खरा मास्टर माइंड अजून मोकाटच आहे. याबाबत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडेच प्रसारमाध्यमांनी अंगुलीनिर्देश केले आहेत. दोन्ही घटनांचा तपास म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का? असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देमनसुख हिरेन प्रकरण म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का?-मुश्रीफ परमबीर सिंग हेच ॲन्टिलया प्रकरणाचे मास्टर माइंड

कोल्हापूर : मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टेलिया या घरासमोर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील खरा मास्टर माइंड अजून मोकाटच आहे. याबाबत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडेच प्रसारमाध्यमांनी अंगुलीनिर्देश केले आहेत. दोन्ही घटनांचा तपास म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का? असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) पत्रकार परिषदेत केला.कोल्हापूर शहरातील थेट पाईपलाईन आढावा बैठकीनंतर शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, मनसुख हिरेन हत्या व ॲन्टेलियासमोरील सापडलेली स्फोटक प्रकरणात ह्यएनआयएह्णने प्रदीप शर्माला अटक केली. मात्र, या सगळ्यांचा मास्टर माइंड अजून मोकाट आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याशिवाय एवढे मोठे धाडस कोणी करू शकत नाही. या प्रकरणाचा तपास दुसऱ्या बाजूने वळवण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून परमबीर सिंगांनी पत्र दिले. त्यामुळे माझे अजूनही म्हणणे, या प्रकरणातील मास्टर माइंड ह्यएनआयएह्णने महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणला पाहिजे.वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजेंनी राज्य सरकारच्या ट्रपमध्ये अडकू नये, असे आवाहन केले होते. याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षण व राज्याच्या पातळीवरील मागण्यांबाबत खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. राज्याच्या अखत्यारितील सर्व मागण्या पूर्ण करण्याचे वचन दिलेले आहे. मग हा ट्रॅप कसला? 

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर