मालेगाव संघाने मारली बाजी

By Admin | Updated: December 19, 2014 00:11 IST2014-12-19T00:07:37+5:302014-12-19T00:11:09+5:30

शूटिंंग व्हॉलिबॉल : सेवागिरी चषक, उत्तर प्रदेश उपविजेता

Malegaon Sangha has won | मालेगाव संघाने मारली बाजी

मालेगाव संघाने मारली बाजी

पुसेगाव : श्री सेवागिरी चषक राज्यस्तरीय शूटिंग व्हॉलिबॉल स्पर्धेत आय.एस.सी.मालेगाव संघाने नेत्रदीपक खेळ करत बलाढ्य उत्तर प्रदेश, अरूण शर्मा संघाचा १५-११, १५-१२ अशा सेट मध्ये पराभव करून श्री सेवागिरी करंडक व २५ हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले.
पुसेगाव, ता. खटाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त या स्पर्धा भरविण्यात आल्या. दोन दिवस सुरू असलेले सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीने मैदान खच्चून भरले होते. यावर्षी राज्यातील ४२ संघांनी सहभाग घेऊन स्पर्धेस मोठा प्रतिसाद दिला. रात्री पावणे दोन वाजता संपलेल्या या अटीतटीच्या सामन्यात उत्तर प्रदेश संघातील अरूण शर्माने केलेला आक्रमक खेळ त्यांच्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. उपविजेत्या उत्तर प्रदेश संघाला १५ हजार रूपयांचे बक्षीस देण्यात आले.
पुसेगाव येथील या स्पर्धेत नंदकुमार भोईटे, रमेश पवार, भाऊसो जाधव, जावेद मनोरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजेत्या संघांना श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मोहनराव जाधव, विजय जाधव, शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते श्री सेवागिरी चषक देण्यात आले.

Web Title: Malegaon Sangha has won