शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्यातला आबा जिवंत करा!

By admin | Updated: August 18, 2015 23:41 IST

सिंधुताई सपकाळ : आबांच्या कुटुंबियांना जपण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

सावळज : कार्यकर्त्यांनो तुमच्यातला आबा जिवंत करा, सुमनसह आबांच्या कुटुंबियांना जपा. आबा त्यांच्या आयुष्यात गरिबी जगले, म्हणून त्यांना गरिबांच्या वेदना कळाल्या. त्यांनी मला भरभरुन दिले, पण देताना या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही. आबांसारखा दाता परत मिळणार नाही. ते आपल्याला सोडून गेले असले तरी, प्रत्येकाच्या हृदयात आबा विचाराच्या रूपाने जिवंत आहे. त्याला जिवंत करा व आबांचे विचार पुढे चालवा, असे भावनिक आवाहन ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी केले.सावळज (ता. तासगाव) येथे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आर. आर. आबा व किशोरदादा मित्रमंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम होते. येणारी प्रत्येक रात्र संपणारी असते. रात्रीनंतर दिवस उगवतो, त्याप्रमाणे प्रत्येक संकटावर मात करता येते. फक्त धीर धरा. आई घराचे मांगल्य असते, तर बाप घराचे अस्तित्व असतो. आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे. ओरबाडण्याची नाही. मी रेल्वेत भीक मागत असताना गाड्या बदलल्या, पण जिंदगी बदलू दिली नाही. कितीही संकटे येऊ देत, जगता येते. फक्त पर्याय शोधा. समोरच्या व्यक्तीची चूक झाली, तर त्याला मोठ्या मनाने माफ करा. माफ करणाऱ्याला माऊली म्हणतात. देशाची वेदना झाकण्यासाठीच महिलांचा जन्म झाला आहे. संस्कृती, परंपरा जपा, देशावर, मातीवर प्रेम करा, असे आवाहनही सिंधुताई सपकाळ यांनी केले.मोहनराव कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद सदस्या कल्पना सावंत, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील, राजू सावंत, गोरख पोतदार, विनायक पाटील, नितीन तारळेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील उपस्थित होते. किशोर उनउने यांनी प्रास्ताविक केले, तर दीपक उनउने यांनी आभार मानले. (वार्ताहर)भारती विद्यापीठाचे उपकारमोहनराव, तुमच्या भारती विद्यापीठाने माझ्या मुलीला सांभाळले, म्हणून मी अनेक अनाथांची माय झाले. पतंगराव कदम व भारती विद्यापीठाचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत, म्हणून मी मोठी झाले, असे सिंधुतार्इंनी मोहनराव कदम यांना सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.