शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नंदवाळ येथील तीर्थंक्षेत्राला जमीन उपलब्ध करून द्या;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सडोली (खालसा) : नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सडोली (खालसा) : नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी अन्यथा टाळ-मृदंगाच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा निर्णय विठ्ठल मंदिर विस्तारीकरण, विकास कृती समिती, वारकरी, ग्रामस्थ यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच अस्मिता कांबळे होत्या.

यावेळी मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे म्हणाले, शासनाने मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा दिला; परंतु भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी जमीन उपलब्ध का केली नाही? यासाठी वारकऱ्यांची चळवळ उभी करण्याची गरज आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, भाविकांचा लढा यशस्वी करण्यासाठी लोकचळवळ उभी करून आंदोलनाचे हत्यार हातात घेतल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही. राजू सूर्यवंशी म्हणाले, शासनाने हा लढा जिंकण्यासाठी सर्वांनी गट-तट न मानता एकत्र येण्याची गरज आहे. हंबीरराव पाटील म्हणाले, मंदिराला शासकीय जमीन मिळविण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढू; प्रसंगी न्यायलयीन लढा लढू.

यावेळी दिगंबर मेडसिंगे, सखाराम चव्हाण, तानाजी निकम, तानाजी कांबळे, सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला कृष्णात पाटील, जोतीराम पाटील, सागर गुरव याच्यासह परिसरातील वारकरी, सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ, दिंडीचालक उपस्थित होते.