शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणात अडकला ‘मुख्य बस मार्ग’

By admin | Updated: February 26, 2015 00:06 IST

चार वर्षे बससेवा बंद : अंतर्गत रस्ते, पाण्याची सुविधा उत्तम; नागरिक रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

कोल्हापूर : अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठ्यासह इतर सुविधा चांगल्या; पण गेली चार वर्षे उखडून पडलेल्या मुख्य बसरूटच्या रस्त्यामुळे फुलेवाडी प्रभागातील नागरिक हैराण आहेत. ‘नगरोत्थान’मधून रस्ता मंजूर झाला आहे; पण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे सांगण्यात येते. रस्ता उखडल्याने या मार्गावरील बसवाहतूक गेली चार वर्षे बंद असून, धुळीने नागरिकांची दमछाक झाली आहे. सुमारे ३०-३५ फुटांचे प्रशस्त रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या गटारी आणि बहुतांश कौलारू घरे असा ग्रामीण तोंडावळा असणारा फुलेवाडी प्रभाग आहे. शहराजवळ असला तरी या प्रभागात मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. गुऱ्हाळघरे, जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. येथील राहणीमानही एखाद्या शहरी गावासारखेच आहे. बसस्टॉप मार्गाची उत्तरेकडील बाजू, शेळके कॉलनी, जयभवानी कॉलनी, ग्रामसेवक कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, फुलेवाडी दत्तमंदिर परिसर, रिंग रोडचा पूर्वेकडील भाग अशी साधारणत: पावणेसहा हजार मतदार संख्या या प्रभागात येते. कोल्हापूर शहरातील इतर प्रभागांच्या तुलनेत या प्रभागातील अंतर्गत रस्ते चकाचक दिसतात. बहुतांश ठिकाणी गटर्स आहेत, पाणी मुबलक आहे, कचरा उठावही वेळेत होतो, असे नागरिकांमधून सांगण्यात येते. येथे खरी समस्या आहे ती मुख्य बस रूटचा रखडलेला रस्ता. गेली चार वर्षे हा रस्ता उखडून टाकल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील अतिक्रमण काढल्याशिवाय रस्त्याचे काम करता येत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. अतिक्रमण काढण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले; पण नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे सांगण्यात आले. शेळके कॉलनीत काही ठिकाणी गटारी व रस्त्यावरील दिव्यांचा प्रश्न भेडसावत आहे. अनेक वेळा गटर्स काढण्यासाठी कर्मचारी येत नसल्याच्या या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. दत्तमंदिराशेजारी असणारे सांस्कृतिक सभागृह वापराविना पडून आहे. नागरिकांनी ते वापरासाठी मागितले होते; पण महापालिकेचे दर पाहता ते त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे. मूलभूत सुविधा देत असताना नागरिकांच्या इतर अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेल्या साडेचार वर्षांत अनेक विकासकामे केलीत. अतिक्रमणामुळे मुख्य रस्ता रखडला आहे. २ ते ६ क्रमांक बसस्टॉपपर्यंत बेड तयार केले आहे. ग्रीन बेल्ट असल्याने अनेक ठिकाणी निधी लावता येत नाही. नागरिकांनी सहकार्य केले तर मुख्य रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावू. - सर्जेराव पाटील, नगरसेवक, फुलेवाडी