शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी नगरपरिषदेत ‘महिलाराज’

By admin | Updated: December 24, 2015 00:56 IST

विषय समिती सभापती पदाची निवडणूक : शर्वरी धारगळकर, देवेंद्र टेमकर, वैशाली पटेकर यांची निवड

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेत सभापतीपदांमध्ये महिलाराज आले आहे. तीन समित्यांवर महिला सभापतीपदी, तर नगराध्यक्ष बबन साळगावकर स्थायी समितीवर पदसिद्ध सभापती, तर सदस्य राजन पोकळे, अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत, साक्षी कुडतरकर यांची निवड करण्यात आली. नियोजन जलनि:स्सारण पर्यटन व पर्यावरण समितीवर उपनगराध्यक्ष राजन पोकळे हे दोन्ही पदसिद्ध सभापती समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर सदस्यपदी कीर्ती बोंद्रे्र, अनारोजीन लोबो, सुभाष पणदूरकर, सुधन्वा आरेकर यांची निवड करण्यात आली.सावंतवाडी नगरपालिकेची विषय समितीची सभापती निवड बुधवारी पार पडली. यात पाणी पुरवठा व उद्यान समिती सभापतीपदी अफरोज राजगुरू, आरोग्य समिती क्रीडा व ज्येष्ठ नागरिक कल्याण समिती सभापतीपदी क्षिप्रा सावंत, तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी साक्षी कुडतरकर यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती नगराध्यक्ष बबन साळगावकर, तर नियोजन व जलनि:स्सारण पर्यटन व पर्यावरण समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांची निवड करण्यात आली. येथील नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या सभापती निवडीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार व मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी काम पाहिले. पाणी पुरवठा व उद्यान समिती सभापती अफरोज राजगुरू, तर सदस्य योगिता मिशाळ, वैशाली पटेकर, देवेंद्र टेमकर, राजू बेग कार्यरत राहतील. आरोग्य समिती, क्रीडा समिती क्षिप्रा सावंत, सदस्यपदी विलास जाधव, संजय पेडणेकर, उमाकांत वारंग, शर्वरी धारगळकर, महिला व बालकल्याण सभापतीपदी साक्षी कुडतरकर, उपसभापती शुभांगी सुकी, सदस्य वैशाली पटेकर, शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे यांची निवड झाली. (वार्ताहर)स्त्रियांच्या सक्षमतेसाठी अनेक उपक्रमसर्व सभापती व सदस्यांचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अभिनंदन केले. प्रशासनाने आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला आम्ही योग्य तो न्याय देऊ, जोमाने काम करू तसेच तिन्ही सभापतीपदी महिलांना संधी मिळाल्याने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे नवनियुक्त सभापतींनी सांगितले.