शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

Kolhapur Politics: एकीचा दिखावाच; महायुतीमध्ये लढाई निश्चित, स्थानिक स्वराज्य संस्थांत येणार आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 18:08 IST

सात तालुक्यांत राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेनेत सरळ सामना

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीच्या माध्यमातून महायुतीतील नेत्यांनी एकीची वज्रमूठ दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही वज्रमूठ टिकण्याची शक्यता धूसर आहे. सर्व पक्षांतील इच्छुकांची संख्या पाहता महायुतीमध्येच टोकाचा संघर्ष पाहावयास मिळणार असून, सात तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदेसेनेतच सरळ सामना होणार हे निश्चित आहे.स्थानिक राजकारणातही महायुतीचे वर्चस्व राहिले पाहिजे, जिल्ह्यातील सगळी सत्ताकेंद्रे आपल्याकडेच हवीत असा अट्टाहास वरिष्ठ नेतृत्वाचा आहे. ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीतून त्याची सुरुवात केल्याने महायुतीच्या स्थानिक नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीने एकसंधपणे राहून स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार नेत्यांनी केला आहे.पण, विधानसभा, लोकसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण कमालीचे क्लिष्ट असते. ही निवडणूक स्थानिक प्रश्नांसह उमेदवारांभोवती फिरत असते. राज्य व देश पातळीवरील मुद्द्यांची येथे चर्चाही होत नाही. त्यात, महायुतीमध्ये पक्षांसह इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, जनसुराज्य, रिपाइं या पक्षांच्या इच्छुकांनी आधिच शड्डू ठोकले आहेत. त्यात सत्तेची ताकद मिळणार असल्याने हौसे-नवशांची नावेही पुढे येणार आहेत.

‘करवीर’ वगळता इतर ठिकाणी त्रांगडेकरवीर तालुक्यात आमदार चंद्रदीप नरके व आमदार अमल महाडिक यांची ताकद आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. दोघेही राष्ट्रवादीसाठी एक-दोन जागा सोडून ताकदीने पुढे जाऊ शकतात. मात्र, कागल, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडीचे आव्हान नव्हे, तर महायुतीतील पक्षांचे राहील.

‘मनपा’चा फार्म्युला?महापालिकेसाठी महायुतीच्या नेत्यांची रणनीती ठरली आहे. एका प्रभागात चार उमेदवार राहणार आहेत. येथे भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि ज्या पक्षाची अधिक ताकद आहे, त्यांचा चौथा उमेदवार असेल, असा फार्म्युला ठरल्याचे समजते.दृष्टिक्षेपात रणांगण...

जिल्हा परिषद : कोल्हापूरपंचायत समिती : करवीर, पन्हाळा, कागल, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा.नगरपालिका : कागल, मूरगूड, पन्हाळा, मलकापूर, पेठवडगाव, जयसिंगपूर, गडहिंग्लज.नगरपंचायती : हुपरी, हातकणंगले, चंदगड, आजरा.

शाहू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीजिल्ह्यात खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांनी इंडिया आघाडीची चांगली मोट बांधली आहे. शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न आहे.

जिल्हाध्यक्षांच्या मतदारसंघातच संघर्षराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या ‘आसुर्ले’, तर नाथाजी पाटील यांच्या ‘आकुर्डे’ मतदारसंघात अनुक्रमे जनसुराज्य व शिंदेसेना, राष्ट्रवादी या पक्षांशी त्यांना दोन हात करावे लागणार आहेत.

महायुती म्हणून ताकदीने निवडणुकांना सामोरे जाणार आहे. एखाद्या ठिकाणी अडचण आली तर नेते बसून मार्ग काढतील. - बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) 

जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही महायुती म्हणून ताकदीने लढणार आहोत. जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. -नाथाजी पाटील (जिल्हाध्यक्ष भाजप)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार