शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’ने ग्रामपंचायतींचा थकीत कर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST

गडहिंग्लज : महावितरण कंपनीने ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विद्युतखांब, विद्युत जनित्रे आणि वीजवाहिन्यांचा थकीत कर ग्रामपंचायतींना तातडीने द्यावा, अशी एकमुखी मागणी ...

गडहिंग्लज : महावितरण कंपनीने ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विद्युतखांब, विद्युत जनित्रे आणि वीजवाहिन्यांचा थकीत कर ग्रामपंचायतींना तातडीने द्यावा, अशी एकमुखी मागणी गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आली.

कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे गडहिंग्लज तालुका सरपंच परिषदेचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे होते.

कांबळे म्हणाले, तालुक्यातील ग्रामपंचायती व सरपंच यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना ताकदीने काम करेल. लवकरच तालुक्यातील सरपंचांची कार्यशाळा घेतली जाईल.

पंधराव्या वित्त आयोगातील कामांच्या प्रस्तावातील बदलाचे अधिकार पूर्वीप्रमाणे ‘बीडीओं’ना द्यावेत. नळयोजनेच्या वीज बिलांसाठी व टीसीएलसाठी अनुदान मिळावे. जीएसटी, कर सल्लागाराचे मानधन, जीएसटी करसल्लागाराचे मानधन लोकसंख्येच्या प्रमाणात १० ते २० हजारांच्या दरम्यान असावे, पथदिव्यांची बिले जिल्हा परिषदेने भरावी, सरपंचांचे मानधन वेळेत मिळावेत, आदी १५ मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

मेळाव्यात माजी तालुकाध्यक्ष उदय चव्हाण, मुगळीचे सरपंच बाळय्या स्वामी, हसूरचंपूच्या सरपंच प्रभावती बागी, वडरगेचे सरपंच सुभाष पोटे, हिरलगेचे सरपंच सचिन देसाई, मासेवाडीचे माजी सरपंच दशरथ कुपेकर यांची भाषणे झाली.

मेळाव्यास, महागावच्या सरपंच ज्योत्स्ना पताडे, निलजीचे आप्पासाहेब गडकरी, तनवडीचे बसवराज आरबोळे, नूलच्या प्रियांका यादव, खमलेहट्टीच्या सुरेखा चौगुले, लिंगनूरच्या अ‍ॅड. परमेश्वरी पाटील, करंबळीचे प्रवीण माळी, आदींसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष कडगावचे सरपंच संजय बटकडली यांनी प्रास्ताविक केले. गडहिंग्लज तालुकाध्यक्ष नेसरीचे सरपंच आशिषकुमार साखरे यांनी आभार मानले.

चौकट :

नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

गडहिंग्लज तालुका कार्याध्यक्ष सचिन देसाई, उपाध्यक्षा सुरेखा चौगुले, चिटणीस आप्पासाहेब गडकरी, विधी व न्याय विभागाच्या प्रमुख अ‍ॅड. परमेश्वरी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.

फोटो ओळी : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष संजय बटकडली यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आशिष साखरे, उदय चव्हाण, संजय कांबळे, सुरेखा चौगुले, ज्योत्स्ना पताडे, परमेश्वरी पाटील, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०२०७२०२१-गड-०७