शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-ताराराणीविरोधात महाविकास आघाडी पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

विद्यमान नगरसेवक : उमा इंगळे, आताचे आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग दीपक जाधव कदमवाडी : प्रभाग क्रमांक २३ रुईकर ...

विद्यमान नगरसेवक : उमा इंगळे,

आताचे आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग

दीपक जाधव

कदमवाडी : प्रभाग क्रमांक २३ रुईकर कॉलनी हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झाला असून या प्रभागात भाजप-ताराराणी आघाडीविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकच उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे प्रभागातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. कोणताही राजकीय वारसा नसतानाही सर्वसामान्य घराण्यातील उमा इंगळे यांनी माजी उपमहापौर प्रकाश पाटील याचे वर्चस्व मोडीत काढत रुईकर काॅलनी या प्रभागात गत निवडणुकीत बाजी मारली होती. या प्रभागावर मूळचे वारणा कोडोलीचे असणारे कोल्हापुरात वास्तव्यास आणणारे राष्ट्रवादीचे प्रकाश पाटील याचे वर्चस्व होते. याच प्रभागातून त्यांनी उपमहापौर म्हणूनही पालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. गत निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर प्रकाश पाटील यांनी आपल्या पत्नी जयश्री पाटील यांना उभे केले होते. मात्र, भाजप-ताराराणी आघाडीच्या उमा इंगळे यांनी त्यांचा पराभव केला. यंदा या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण पडले असून पुन्हा उमा इंगळे याच रिंगणात असणार आहेत. राष्ट्रवादीकडून प्रकाश पाटील तर काँग्रेसकडून प्रवीण पुजारी इच्छुक आहेत. सुनील भोसले यांनीही या प्रभागातून चाचपणी केली आहे. विशेष म्हणजे भाजप- ताराराणी आघाडीला शह देण्यासाठी या प्रभागात महाविकास आघाडीचा एक उमेदवार म्हणून प्रकाश पाटील हे रिंगणात असण्याची

शक्यता आहे. मात्र, इतर पक्ष या खेळीला किती प्रतिसाद देतात, हेही पाहावे लागणार आहे.

सोडवलेले नागरी प्रश्न

: अंतर्गत रस्ते, अंतर्गत स्टेट लाइट, नक्षत्र व त्रिकोणी गार्डन विकसित, हिंद विद्यामंदिरचे नूतनीकरण एलआयसी ग्राउंडचे नूतनीकरण.

रखडलेले प्रश्न

: काही ठिकाणी अंतर्गत रस्ते अपूर्ण, गटर्स अपूर्ण असून रस्त्याकडेला साइट पट्ट्याही अर्धवट आहेत. टाॅवर गार्डनचे सुशोभीकरण रखडले.

कोट : भागातील जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असून भागातील २ कोटींहून अधिक विकासकामे पूर्ण केली आहेत. टावर गार्डनमध्ये म्युझिक व लाइट शो करण्यात येणार आहे.

-उमा इंगळे, नगरसेविका

गत निवडणुकीतील प्रमुख उमेदवार. उमा इंगळे-११०० (भाजप ताराराणी), जयश्री पाटील -८२१ (राष्ट्रवादी),

शैला चव्हाण-४५५ (काँग्रेस), जान्हवी बुलबुले १४३ (शिवसेना)

फोटो: प्रभाग क्रमांक २३

प्रभाग क्रमांक २३ रुईकर काॅलनीमधील अंतर्गत गटर्सची झालेली दुरवस्था.