शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

Maharashtra Bandh : कोल्हापूर : बारा हजार वकिलांचा पाठिंबा, सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 19:00 IST

महाराष्ट्रभर चाललेल्या मराठा आरक्षणासंबंधी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहा जिल्ह्यांतील सुमारे बारा हजार वकिलांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शविला. मोर्चात वकील सहभागी झाल्याने गुरुवारी दिवसभर सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले. वकील आणि पक्षकारांनी न्यायालयाकडे पाठ फिरविल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार ६०० खटल्यांचे काम ठप्प राहिले.

ठळक मुद्देबारा हजार वकिलांचा पाठिंबा,मोर्चात उत्स्फूर्त सहभागसहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प 

कोल्हापूर : महाराष्ट्रभर चाललेल्या मराठा आरक्षणासंबंधी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहा जिल्ह्यांतील सुमारे बारा हजार वकिलांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शविला. मोर्चात वकील सहभागी झाल्याने गुरुवारी दिवसभर सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले. वकील आणि पक्षकारांनी न्यायालयाकडे पाठ फिरविल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार ६०० खटल्यांचे काम ठप्प राहिले.

कोल्हापुरात भव्य मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सहा जिल्ह्यांतील वकिलांनी न्यायालयीन काम बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधीचे पत्र कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या बार असोसिएशनला खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिले आहे. त्यानुसार गुरुवारी सहा जिल्ह्यांतील सुमारे बारा हजार वकील बंद व मोर्चामध्ये सहभागी झाले.

कोल्हापुरातून सुमारे २00 वकील ड्रेसकोडमध्ये सकाळी दहा वाजता दसरा चौकात एकत्र आले. मोर्चामध्ये सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत सर्व वकील आंदोलनस्थळी ठाण मांडून होते. इचलकरंजीमधील वकिलांनीही आंदोलनास पाठिंबा दर्शवित न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिल्याने येथील ३०० खटल्यांचे काम ठप्प झाले.

आंदोलनामध्ये खंडपीठ कृ ती समितीचे निमंत्रक व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, ज्येष्ठ वकील शिवाजीराव राणे, अजिम मोहिते, महादेव आडगुळे, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, रणजित गावडे, इंदिरा राजेपांढरे, प्रताप जाधव, आनंदराव जाधव, विलासराव दळवी, चंद्रकांत मोरे, प्रिया कुंडले, पूजा कटके, दिप्ती घाटगे, सरिता भोसले, आदींसह वकील सहभागी झाले होते.न्यायसंकुल परिसरात शुकशुकाटकसबा बावडा येथील न्यायसंकुल परिसरात वकील, पक्षकार, पोलीस यांची नेहमी वर्दळ असते. गुरुवारच्या बंदमध्ये वकिलांनी सहभाग घेऊन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही वकील, पक्षकार किंवा पोलीस न्याय संकुलाकडे दिवसभर फिरकलेच नाहीत. त्यामुळे याठिकाणी दिवसभर शुकशुकाट होता. 

 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूरCourtन्यायालय