शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडीचे अपर पोलिस अधीक्षक अटकेत, दारु विक्रीच्या परवान्यासाठी महाबळेश्वरच्या व्यावसायिकाची कोटीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 15:31 IST

कोल्हापूर : महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकास दारूविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून चौघांनी एक कोटी पाच लाखांची फसवणूक केल्याचा ...

कोल्हापूर : महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकास दारूविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून चौघांनी एक कोटी पाच लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल आहे. याप्रकरणी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अपर पोलिस अधीक्षक श्रीकांत नामदेवराव कोल्हापुरे (सद्या रा. पुणे, मूळ रा. कोल्हापूर) याला अटक झाली. कोल्हापूर सीआयडीच्या अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या पथकाने नाशिक-मुंबई मार्गावर खटवळ टोलनाका येथे अटकेची कारवाई केली.पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील अपर पोलिस अधीक्षक कोल्हापुरे आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेल व्यावसायिकाकडून एक कोटी पाच लाख रुपये रोख आणि धनादेशाद्वारे घेतले. मात्र, दारू विक्रीचा परवाना मिळवून दिला नाही. याबाबत हॉटेल व्यावसायिकाने पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली होती. तपास अधिकारी अधीक्षक दुबुले यांनी या गुन्ह्यातील संशयित हनुमंत विष्णूदास मुंढे, अभिमन्यू रामदास देडग आणि बाळू बाबासाहेब पुजारी या तिघांना अटक केली होती.पाच दिवसांची पोलिस कोठडी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार श्रीकांत कोल्हापुरे हा पसार होता. दुबुले यांच्या पथकाने कोल्हापुरे याला अटक करून वाई न्यायालयात हजर केले. त्याची पाच दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी झाली. दुबुले यांच्यासह उपअधीक्षक गणेश माळी, निरीक्षक वर्षा कावडे, अंमलदार विजय कुंभार, निवृत्ती पाडेकर, जमीर मुल्ला आणि स्वप्नील जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीPoliceपोलिस