शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मडिलगे, फराकटेवाडी, ससेगाव ‘भारी’

By admin | Updated: January 14, 2016 00:28 IST

ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार : शाळा, अंगणवाडी, कुटुंब कल्याणसाठी निवड

कोल्हापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यांतील तीन ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. त्यामध्ये मडिलगे, फराकटेवाडी, ससेगावचा समावेश आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ, शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती विकास, शाळा, अंगणवाडी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय तपासणीत गोंदियाच्या जिल्हा परिषदेने मूल्यमापन केले होते. स्पर्धेमध्ये जिल्ह्णातील तीन ग्रामपंचायतींची निवड केली आहे. प्रथम दोन क्रमांक मिळालेल्या ग्रामपंचायती या विभागीय स्तरावरील स्पर्धेस पात्र ठरल्या आहेत. ‘स्वच्छतेचा महामंत्र’ पोहोचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने रोख रक्कम स्वरुपात बक्षिसे देऊन या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती व मिळालेला क्रमांक असा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेअंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायतीस प्रथम, हातकणंगले व कागल तालुक्यातील किणी व फराकटेवाडी ग्रामपंचायतींना द्वितीय (विभागून), करवीर तालुक्यातील बहिरेश्वर-मडिलगे ग्रामपंचायतीस तृतीय (विभागून) क्रमांक मिळाले. शाहू, फुले, आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती स्पर्धेअंतर्गत जिल्हा स्तरावर निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीत हातकणंगले तालुक्यातील किणी ग्रामपंचायतीस प्रथम, करवीरमधील उचगाव ग्रामपंचायतीस द्वितीय, राधानगरीतील कपिलेश्वर ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांक मिळाला. (प्रतिनिधी) प्रथम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती ४सानेगुरुजी स्वच्छ शाळा : मडिलगे (ता. आजरा) ग्रामपंचायतीस प्रथम क्रमांक. ४सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी : फराकटेवाडी (ता. कागल) ४कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत स्व. आबासाहेब खेडकर उत्कृष्ट कामासाठी पुरस्कार : ससेगाव (ता.शाहूवाडी) ४स्वर्गीय वसंतराव नाईक पाणी-सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार : धरणगुत्ती (ता. शिरोळ) ४सामाजिक एकता बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : उचगाव (ता. करवीर)