शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमागाला २ रुपये ६६ पैसे वीजदर

By admin | Updated: November 19, 2015 01:12 IST

हाळवणकर यांची माहिती : ऊर्जामंत्र्यांची तत्त्वत: मान्यता; यंत्रमाग वीजदर निर्णयामधील त्रुटी दूर होणार

इचलकरंजी : सात नोव्हेंबरच्या शासन निर्णयामध्ये दोन रुपये ६६ पैसे दराने यंत्रमागाला वीज देण्याचा निर्णय झाला. मात्र, इंधन अधिभारावरील सवलतीचा उल्लेख नसल्यामुळे या शासन निर्णयात त्रुटी राहिल्या. या त्रुटी दूर करण्याची मागणी आमदार सुरेश हाळवणकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी मंत्रिमहोदयांनी शासन निर्णयात दुरुस्ती करून सवलतीचा लाभ देण्याचे तत्त्वत: मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करताना आ. सुरेश हाळवणकर यांनी दि. ३१ आॅक्टोबर २०१५च्या परिपत्रकान्वये महावितरण कंपनीने यंत्रमाग वीज ग्राहकांना आॅक्टोबर, नोव्हेबर आणि डिसेंबर २०१५ या तीन महिन्यांसाठी प्रतियुनिट १०८.६० पैसे ते १३७.६० पैसे इतका इंधन समायोजन आकार लागू केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने यंत्रमागास दोन रुपये ६६ पैसे इतका सवलतीचा वीजदर लागू करूनसुद्धा इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे एकूण वीजदरात वाढ दिसत आहे. त्यामुळे टॅरिफमध्ये यंत्रमाग वीजदरास ५० टक्के सवलत असल्यामुळे इंधन समायोजन आकारामध्येसुद्धा ५० टक्के सवलत देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दि. ५ मार्च २०१५ च्या शासन निर्णयातील अट क्र. ४ मध्ये इंधन समायोजन आकारात अनुदान देण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे यंत्रमाग वीज ग्राहकांना इंधन समायोजन आकारातसुद्धा सवलत मिळत होती, परंतु दि. ७ नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयामध्ये इंधन समायोजन आकारात देण्यात येणाऱ्या अनुदानाचा उल्लेख नाही. त्यामुळे इंधन समायोजन आकारातील लाभ ग्राहकांना मिळणार नाही. परिणामी वाढीव वीजदर यंत्रमाग ग्राहकांना भरावा लागणार आहे. त्यामुळे यामधील त्रुटी दूर करून इंधन समायोजन आकारामध्ये सवलतीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली. ती मंत्रिमहोदयांनी तत्त्वत: मान्य करून शासन निर्णय दुरुस्त करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर) दिलासा : इंधन समायोजन आकारात अनुदान ७ नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयामध्ये इंधन समायोजन आकारात देण्यात येणाऱ्या अनुदानाचा उल्लेख नसल्याने इंधन समायोजन आकारातील लाभ ग्राहकांना मिळत नाही. हा लाभ देण्यासाठी यातील त्रुटी दूर होणार आहेत.