शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र केसरी ‘सुंदर’च्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

By admin | Updated: March 10, 2017 22:49 IST

एका झंझावाताचा अंत; शंभरहून अधिक पहिल्या क्रमाकांची बक्षिसे

खटाव : तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलेल्या खटावमधील विजय गणपत भूप यांचा शर्यतीचा बैल सुंदर याच्या अकस्मात मृत्यूच्या बातमीने खटावमध्ये क्षणभर शांतता पसरली. आणि क्षणार्धात भूप यांच्या घरासमोर ग्रामस्थांनी सुंदरच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. भूप यांच्या घराजवळच असलेल्या गोठ्यात सुंदर रोज उभा असायचा; परंतु दि. ८ पासून सुंदरच्या बदललेल्या हालचालीमुळे भूप यांचे त्याच्याकडे लक्ष गेले असता तो उभा राहू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना त्वरित घरी आणून त्याची तपासणी केली. औषधोपचार केले; परंतु काहीच ईलाज न चालल्याने अचानक सुंदरने क्षणार्धात अखेरचा श्वास घेतला. सुंदरचे वय सहा वर्षे होते. अवघ्या दोन वर्षांचा असताना त्याला भुपांनी घरी आणले. चार वर्षांपासून आतापर्यंत सुंदरने शंभरहून अधिक पहिल्या क्रमांकाची बक्षिसे मिळवत शर्यतीचा राजा, बरोबरच ‘महाराष्ट्र केसरी’ नावाने त्याला संबोधला जायचे. कोठेही बैलांच्या शर्यती असतील तर त्याच्या तोडीस कोणताच बैल टिकत नव्हता. एखाद्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे सुसाट पळणाऱ्या या बैलाचा दबदबा असल्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या बैलाच्या खरेदीकरिता मागणी होत होती. दुष्काळी परिस्थितीत याच सुंदर बैलाची १३ लाखांला मागणी केली होती. परंतु भूप यांनी सुंदरला न विकण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे सुंदर त्यांच्या गोठ्यात उभा होता. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळातही गोठ्याची शान असलेल्या सुंदर बरोबरच त्याचा साथीदार असलेला दुसरा बैल, त्याच बरोबर लहान दोन खोंड अशा एकूण पाच बैलांना छावणीत न ठेवता मोठ्या कष्टाने त्यांचे पालनपोषण केले. त्याही परिस्थितीत त्यांना लागणाऱ्या खाद्याची व्यवस्था करून त्याची घरीच सोय केली होती. गेल्या तीन वर्षांपासून मात्र बैलगाड्यांच्या शर्यतीवर शासनाने बंदी आणली. या शर्यती आज सुरू होतील, उद्या सुरू होतील, या आशेवर जगणाऱ्या या शेतकऱ्याला अखेर आपला बैल गमवावा लागला. ज्या गोठ्यात सुंदरची पंचारतीने प्रत्येकवेळी ओवाळणी व्हायची, गुलालाची उधळण व्हायची त्याच गोठ्यातून त्याची निघालेली अंतिम यात्रा पाहताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. (वार्ताहर)गेल्या तीन वर्षांपासून या शर्यती बंद झाल्यामुळे आर्थिक तंगी जरी असली तरी कितीही ओढाताण झाली तरी बैलांच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. एकवेळ कुटुंबाकडे कमी; पण या बैलांच्या देखभालीत कुठेही हलगर्जीपणा होऊ दिला नाही. या तीन वर्षांत शर्यत बंदी असली तरी बिनजोड शर्यती लावून त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवण्यात सुंदरने दिलेली साथ कधीच विसरू शकणार नाही. - विजय भूप, बैल मालकमहाराष्ट्र केसरीचा मान मिळवलेल्या सुंदर बैलाचा अंत.